Business : कमी खर्चात भरपूर पैसे मिळवून देईल ‘हा’ व्यवसाय, सरकारकडूनही मिळेल मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business :प्रत्येकाला वाटत असते कि छोटासा का असेना पण आपला स्वतःचा एखादा व्यवसाय असावा. मात्र योग्य माहिती आणि पुरेसे भांडवल नसल्यामुळे ते करणे अवघड जाते. आज आपण अशा एका उत्पादनाबद्दल चर्चा करणार आहोत जो प्रत्येक घरात वापरला जातो आणि त्याची मागणी कधीही कमी होत नाही. आज आपण साबण बनवण्याच्या व्यवसायाबद्दल बोलणार आहोत. ते मशीनने किंवा हाताने देखील बनवता येतील. यासाठी जास्त पैसेही लागणार नाहीत.

भारतात किती प्रकारचे साबण वापरले जातात ?

भारतात तीन प्रकारचे साबण वापरले जातात. पहिला सौंदर्य साबण, दुसरा कपडे धुण्याचा साबण आणि तिसरा औषधी गुणधर्म असलेला साबण. याशिवाय किचनमध्ये वापरल्या जाणार्‍या गोळ्या आणि सुगंधी साबणही आहेत. मागणी आणि स्पर्धा लक्षात घेऊन यापैकी कोणताही साबण बनवता येतील. Business

खर्च आणि नफा

गाव असो की शहर साबणाची मागणी नेहमीच असते. यासाठी सुमारे 750 चौरस फूट जागा लागेल. या कामासाठी 8 प्रकारची उपकरणे वापरली जातात. यासाठी 1-1.5 लाख खर्च येईल. सुमारे 4 लाख रुपयांमध्ये आपल्याला साबण बनवण्याचे काम सुरू करता येईल. यासाठी केंद्र सरकार कडून मुद्रा योजनेंतर्गत 80 टक्क्यांपर्यंत लोनही मिळेल. याद्वारे दरवर्षी सुमारे 4 लाख किलो साबण तयार करता येईल. याद्वारे एका वर्षात 47 लाख रुपपैसे मिळवता येईल. तसेच सर्व दायित्वे दिल्यानंतर 6 लाख रुपयांपर्यंत वार्षिक नफा मिळू शकेल. Business

बँकेकडून मिळेल कर्ज

साबणाचा कारखाना सुरु करण्यासाठी एकूण 15 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकेल. यासाठी आपल्याला फक्त 4 लाख रुपये गुंतवावे लागतील. तसेच जागा, यंत्रसामग्री, वर्किंग कॅपिटलसाठी सरकारकडून 80 टक्के कर्ज मिळू शकेल. त्याचबरोबर मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेकडून कर्ज देखील मिळू शकेल. Business

हे पण वाचा : 

Business Idea: कमी खर्चात ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा भरपूर पैसे; कमी खर्चात जास्त नफा

15 दिवसांत पैसे डबल…; ‘या’ कंपनीच्या शेअर्सने केली कमाल

 

 

Leave a Comment