व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

15 दिवसांत पैसे डबल…; ‘या’ कंपनीच्या शेअर्सने केली कमाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 15 दिवसात पैसे डबल असं जर का कोणी तुंम्हाला सांगितलं तुम्हाला विश्वास बसणार नाही, उलट तुम्हीच समोरच्याला वेड्यात काढाल…. पण होय , हे खरं झालं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा मल्टीबॅगर स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्याने केवळ 15 ट्रेडिंग सत्रांमध्ये म्हणजेच स्टॉक मार्केटच्या 15 ट्रेडिंग दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

ऑफलाइन आणि ऑनलाइन लर्निंग सोल्यूशन्स देणारी कंपनी Veranda Learning Solution अलीकडेच त्याचा IPO लाँच केला आहे. कंपनीच्या शेअर्सच्या लिस्टिंगनंतर, फक्त 15 ट्रेडिंग दिवसात, त्यांची किंमत IPO च्या किमतीपेक्षा 101% वाढली. म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्याच्या IPO मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याला 2.01 लाख रुपये परत मिळतील.

IPO साठी, कंपनीने शेअरची किंमत 137 रुपये निश्चित केली होती. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात याची किंमत 276.65 वर बंद झाली होती. म्हणजेच अवघ्या 15 ट्रेडिंग दिवसांत त्याच्या शेअरच्या किमतीत 139 रुपयांची वाढ झाली आहे.

Veranda Learning Solutions चा IPO 29 मार्च ते 31 मार्च दरम्यान आला. याची किंमत 130 ते 137 रुपये होती. कंपनीचे शेअर्स 5 एप्रिल रोजी वाटप करण्यात आले आणि 11 एप्रिल रोजी लिस्ट ;लागली. कंपनीचे शेअर्स त्याच्या इश्यू किमतीच्या 14.60% प्रीमियमवर लिस्टेड झाले.

दरम्यान, शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीनुसार लक्ष्य निश्चित केले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच, कोणत्याही कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्यावा.