सातारा | हॅलो माध्यम समूहाच्या बिझनेसनामा दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. सातारा जिल्ह्यातील शून्यातून विश्व उभारलेल्या उद्योजकांच्या प्रवासाची गोष्ट अशा थीमवर आधारित बिझनेसनामा दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा (Businessnama Magazine) नुकताच कराड येथे पार पडला. व्यावसायिक प्रगती करायची असेल तर यशस्वी उद्योजकांच्या यशा मागची गणितं समजून घेणे गरजेचे आहे. बिझनेसनामा दिवाळी अंकामध्ये मूळच्या सातारा जिल्ह्यातील असलेल्या विशेष उद्योजकांच्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक सातारकाराने बिझनेसनामा दिवाळी अंक वाचावा असे आवाहन खासदार पाटील यांनी केले.
यावेळी सनबीम शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सारंग पाटील (बाबा), हॅलो माध्यम समूहाचे संस्थापक आदर्श दीपक पाटील, माया पाटील, पत्रकार सुधीर पाटील, क्रांती चव्हाण, अशोक सुतार, संतोष गुरव, अक्षय पाटील, तेजस कुंभार आदी उपस्थित होते.
https://www.instagram.com/reel/CzjYGKrITsZ/?utm_source=ig_web_copy_link
अंकात काय आहे?
बिझनेसनामा दिवाळी अंकामध्ये सातारा जिल्ह्यातील विशेष उद्योजकांच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये भारत फोर्जचे बाबा कल्याणी, बेकरी व्यवसायातील लोकप्रिय ब्रँड पालेकर फूड्स, बीव्हीजी इंडियाचे हनुमंतराव गायकवाड या तीन कव्हर स्टोरी असून सनबीमचे संस्थापक सारंग पाटील (बाबा), मोदीज नारायण पेढेवालेचे मालक प्रशांत मोदी लाटकर, पॉपकॉर्न बनवणाऱ्या Endeavour फूड्सचे शरीफ मुजावर आणि सातारा जिल्ह्याच्या दैदिप्यमान इतिहासाची ओळख करून देणारा गोवा येथे उपजिल्हाधिकारी पदी कार्यरत अभिजित निकम, राहुल निकम यांचा विशेष लेख समाविष्ट करण्यात आला आहे.
अंक घरपोच कसा मिळवाल?
बिझनेसनामा दिवाळी अंक तुम्ही घरपोच मिळवू शकता. यासाठी तुम्हाला ७३५०३६२९११ या क्रमांकावर फोन पे/गुगल पे द्वारे २०० रुपये मूल्य पाठवायचे आहे. त्यानंतर त्याच नंबरला तुमचा पोस्टाचा पत्ता Whatsapp केल्यास तुम्हाला तुमचा अंक घरपोच मिळेल.
तुम्ही उद्योजक असाल किंवा नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर बिझनेसनामा दिवाळी अंक तुमच्यासाठी अतिशय उपयोगी ठरू शकतो. व्यवसायातील लहान सहान गोष्टी, यशस्वी उद्योग उभा करताना आलेले महत्वाचे अनुभव, बिझनेस निगडित निरीक्षणे तसेच कौशल्य यावर भाष्य करणारा बिझनेसनामा अंक घराघरात पोहोचावा अन मराठी उद्योजक यशाच्या शिखरावर पोहोचावेत असा प्रयत्न बिझनेसनामा मासिकाद्वारे केला जातो.