Bussiness Idea | ‘या’ व्यवसायात करा फक्त 50 हजारांची गुंतवणूक, महिन्याला होईल बक्कळ कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bussiness Idea | आजकाल अनेकजण व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतात. परंतु व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल आणि त्यातून किती नफा मिळतो. या सगळ्याचा विचार करून व्यवसाय केला जातो. परंतु अनेकजण व्यवसायामध्ये खूप भांडवल गुंतवावे लागते. त्यामुळे व्यवसाय करण्याचा विचार बाजूला ठेवतात. परंतु तुम्ही बाजारपेठेतील मागणीचा विचार करून अगदी कमी पैशात देखील चांगला व्यवसाय सुरू करू शकता. आणि त्यातून चांगला नफा देखील मिळू शकता. त्यासाठी केवळ तुमच्याकडे ते विकण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे. आता आपण अशाच एका व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही अगदी कमीत कमी गुंतवणुकीत चांगला व्यवसाय करू शकता.

दागिने हा महिलांच्या अगदी जवळचा विषय असतो. त्यांना प्रत्येक साडीवर वेगवेगळे दागिने घालायला आवडतात. आजकाल सोन्याचे दर खूपच वाढले असल्यामुळे अनेक स्त्रिया सोन्याचे दागिने खरेदी न करता आर्टिफिशल ज्वेलरी वापरतात. आणि मोठ्या प्रमाणात त्यांची विक्री देखील होत असते. तुम्ही जर या सगळ्याचा विचार करून एखाद्या आर्टिफिशियल ज्वेलरीचे दुकान उभारले, तर त्याच्या माध्यमातून खूप कमी वर्षात तुम्ही चांगला फायदा मिळू शकतो. हा व्यवसाय तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील करता येतो. परंतु ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही आर्टिफिशियल ज्वेलरीची विक्री करून चांगला पैसा मिळू शकतात.

ऑफलाइन पद्धतीने व्यवसाय कसा करायचा ? | Bussiness Idea

आर्टिफिशल ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय सुरू तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा असेल, तर त्यासाठी जागा निवडावी लागेल. तुम्हाला बाजारपेठेची जागा निवडावी लागेल. जिथे जास्त गर्दी असेल अशा ठिकाणी तुम्हाला दुकान चालू करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन फॅशनेबल दागिने विकत आणावे लागतील. जेणेकरून ग्राहक तुमच्याकडे येतील आणि त्यांना सगळ्या डिझाईनमध्ये दागिने मिळतील.

ऑनलाइन व्यवसाय कसा करायचा?

ज्वेलरीचा व्यवसाय तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील करू शकता. यासाठी तुम्ही फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन सारख्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मची मदत घेऊ शकता. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या स्वतःची वेबसाईट देखील तयार करून हा व्यवसाय करू शकता. त्याचप्रमाणे सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही विक्री करू शकता.

दागिने खरेदी कुठून करायचे? | Bussiness Idea

हा व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल, तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात ज्वेलरी विकत घेणे गरजेचे असते. ही ज्वेलरी तुम्ही दिल्ली, मुंबई, कोलकत्तामधील न्यू मार्केट आणि हैदराबाद यांसारख्या शहरांमधून खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला इतर बाजारपेठेतील गरजेचे आहे तुम्ही. अगदी स्वस्त दरामध्ये दागिने विकत घेऊ शकता आणि चांगला व्यवसाय करू शकता.

किती नफा मिळतो?

सध्या या आर्टिफिशियल दागिन्यांच्या विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे तुम्ही किरकोळ किमतीच्या दहा पट जास्त किमतीने ही विक्री करू शकता. म्हणजे तुम्ही एखाद्या पाच हजार रुपयांची विक्री केली, तर त्यामध्ये दोन तीन हजाराचा नफा सहज मिळू शकता. अशा प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवसाय केला, तर महिन्याला 50000 रुपयांपर्यंत तुम्हाला नफा मिळू शकतो.