हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सरकरी बँकांपैकी एक असलेल्या Bank of Baroda ने एक खास ऑफर आणली आहे. ज्याअंतर्गत आपल्याला स्वस्तात घर (Residential Property) खरेदी करण्याची संधी मिळत आहे. हे लक्षात घ्या कि, BOB कडून या मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे. 10 नोव्हेंबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. या अशा मालमत्ता आहेत ज्या डिफॉल्टच्या लिस्टमध्ये आल्या आहेत. याबाबतची माहिती IBAPI (Indian Banks Auctions Morgaged Properties Information) ने दिली आहे.
Bank of Baroda कडून ज्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. यामध्ये रेसिडेन्शिअल, कमर्शिअल, इंडस्ट्रियल, एग्रीकल्चर या मालमत्तांचा समावेश आहे. 10 नोव्हेंबरला बँकेकडून एकूण 350 मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे.
लिलाव केला जाणार
आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत Bank of Baroda ने याबाबत माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये बँकेने लिहिले की,”मेगा ई-लिलाव 10 नोव्हेंबर 2022 रोजी केला जाईल. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेचा ई-लिलाव केला जाणार आहे. येथे वाजवी किंमतीत मालमत्ता खरेदी करू शकता.”
Your dream of owning a property across India now comes with more than 350 options. Participate in the Mega-e-Auction on the 10th of November and own a property of your choice.
Know more https://t.co/d0hONuFVUr#BankofBaroda #AzadiKaAmritMahotsav @AmritMahotsav pic.twitter.com/UjcMhtPX35— Bank of Baroda (@bankofbaroda) November 8, 2022
अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन
या Bank of Baroda मेगा ई-लिलावासाठी इच्छुक बोलीदारांना e-Bkray पोर्टल https://ibapi.in/ वर रजिस्ट्रेशन करावे लागेल. या पोर्टलवर ‘बिडर्स रजिस्ट्रेशन’ वर क्लिक करून मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
द्यावे लागणार केवायसी डॉक्युमेंट्स
बोलीदाराला आवश्यक KYC डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. केवायसी डॉक्युमेंट्सचे ई-लिलाव सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे व्हेरिफिकेशन केले जाईल. यासाठी 2 दिवस लागू शकतात.
अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा
या मालमत्तेच्या लिलावाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी https://ibapi.in/https://www.bankofbaroda.in/e auction.htm?utm_source=SM&utm_medium=Post&utm_campaign=MegaAuction_km या लिंकला भेट द्या.
हे पण वाचा :
Lava ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत अन् फीचर्स तपासा
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!