Wednesday, February 1, 2023

नव्या पुणे बंगलोर हायवेच्या ग्रीन काॅरिडाॅरमधील जमिनींच्या किंमती वाढल्या; गावांची यादी चेक करा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाला पर्याय म्हणून पुणे- बंगळूर द्रुतगती मार्ग होत आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील पुणे सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यातून जाणार आहे. याठिकाणी लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे महामार्ग लगत असलेल्या जमिनीला निश्चितच सोन्याचा भाव मिळणार आहे. विशेष म्हणजे काही लोकांनी हा ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या जमीनी खरेदीचा सपाटा सुरू केला आहे.

नव्या पुणे- बंगळूर द्रुतगती महामार्गाचा प्रकल्प सुमारे ३१ हजार कोटींचा असून एकूण ७४५ किलोमीटर लांबीचा हा द्रुतगती मार्ग बांधण्यात येत आहे. दर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे हा ज्या गावातून जाणार आहेत त्या गावांची नावे निश्चित झाली आहेत त्यानुसार सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांची नावे आम्ही इथे सांगणार आहोत.

- Advertisement -

यामध्ये खटाव तालुक्यातील चिंचणी, डिस्कळ, काळेवाडी, अनपटवाडी, शेंडेवाडी, ललगुण, काटेवाडी, फडतरवाडी बुद्रुक, बुध, फडतरवाडी, वेटणे, फडतरवाडी, पुसेगाव, कटगुण, खटाव, दरुज, भुरकवडी, धाकरवाडी, वडूज, सिध्देश्वर कुरोली, वाकेश्वर, ऊंबर्डे, नायकाचीवाडी, गुरसाळे, सिरसाळवाडी, अंबवडे, गोऱ्हेगाव- निमसोड, पोफळकरवाडी, मोराळे, मरडवाक, गुंडेवाडी, शेंडगेवाडी, मायणीचा समावेश आहे.

खंडाळा तालुक्यातील शिरवळ, पिसाळवाडी, डांगेवाडी, माने कॉलनी, भोळी, शेखमिरवाडी, भादवडे, बावडा, शिवाजीनगर, म्हावशी, अहिरे, धावडवाडी, घाटदरे, सुखेड, खेड बुद्रुक, निंबोडी, कोपर्डे या गावांचा समावेश आहे.

फलटण तालुक्यातील सासरे, शेरेचीवाडी, हिंगणगाव, आदर्की बुद्रुक आणि कोरेगाव तालुक्यातील भादळे, हासेवाडी, नागेवाडी, घोडेवाडी, भादळे फॉरेस्ट या गावांची नावं आहेत. या गावांतील नेमकी कोणती जमीन जाणार, हे रस्त्यांसाठी येणाऱ्या भूसंपादनाच्या नोटिसीनंतरच समजणार आहे. मात्र सदर महामार्गामुळे गावांच्या परिसरात असलेल्या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे हे मात्र नक्की.