नंदुरबार | जिल्हा परिषद व पोटनिवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने मोठी बाजी मारलेली आहे. नंदुरबार पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 11 जागेसाठी तर पंचायत समितीच्या 14 जागेसाठी निवडणूक लागलेली होती. यामध्ये जिल्हा परिषदेत भाजपाने 4 जागांवर यश मिळविले असून 4 जागा गमावल्या असल्याने मोठा फटका बसलेला आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षातही पोटनिवडणुकीत काॅंग्रेसने मोठी बाजी मारली आहे. 11 जागांपैकी जिल्हा परिषदेत 3 तर पंचायत समितीच्या 14 जागांपैकी 4 जागा मिळविलेल्या आहेत. तर अद्याप नंदुरबार पंचायत समितीच्या 5 जागांचे निकाल येणे बाकी आहे. जिल्हा परिषदेत आजच्या निवडणुकीच्या निकालात शिवसेना 3 तर राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळाली आहे.
दिग्गज विजयी
नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल घोषित करण्यास सुरूवात झाली असून माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या तथा भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या भगिनी डॉ. सुप्रिया गावित या कोळदे गटातून १३६९ मतांनी विजयी झाल्या आहेत. १२ हजार ५६३ मतांपैकी ६ हजार ७०७ मते त्यांना मिळाली. येथे शिवसेनेच्या आशा पवार ५ हजार ३३९ मते मिळून पराभूत झाल्या. अक्कलकुवा आणि खापर गटात काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये खापर गटातून आदिवासी विकास मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री वकील के. सी. पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी गटातून सुरय्या मकरानी या विजयी झाल्या आहेत. होळ तर्फे हवेली गणात भाजपच्या सिमा मराठे २६८८ मते घेऊन विजयी झाल्या. तर शिवसेनेच्या स्वाती मराठे यांना २५७६ मते मिळाली.