BYD ATTO 3 : BYD ची पहिली इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च; 521 किमी रेंज

BYD ATTO 3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (BYD ATTO 3) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर चिनी ऑटो मॅन्युफॅक्चरिंग कंपनी BYD ने देखील आपली पहिली इलेक्ट्रिक कार BYD ATTO 3 भारतात लाँच केली आहे. ही भारतातील पहिली स्पोर्टी बॉर्न ई-SUV आहे, जी BYD च्या ई-प्लॅटफॉर्म 3.0 वर तयार केली गेली आहे. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या गाडीचे खास वैशिठ्ये…

या इलेक्ट्रिक SUV मध्ये L2 एडवांस्ड (BYD ATTO 3)ड्राइविंग असिस्टेंस सिस्टम, 7 एअरबॅग्ज, पॅनोरॅमिक सनरूफ, 12.8-इंच अ‍ॅडॉप्टिव्ह रोटेटिंग सस्पेन्शन इलेक्ट्रॉनिक पॅड, 360° होलोग्राफिक पारदर्शक इमेजिंग सिस्टीम, NFC कार्ड की, वाहन टू लोड मोबाइल पॉवर स्टेशन आणि इतर प्रमुख कॉन्फिगरेशन्स आहेत ज्यामुळे ही गाडीचे मार्केट मध्ये तगडी फाईट देऊ शकते.

BYD ATTO 3

521 किमी रेंज- 

ARAIच्या दाव्यानुसार ही इलेक्ट्रिक (BYD ATTO 3) गाडी तब्बल 521 किमी रेंज देऊ शकते. या इलेक्ट्रिक SUV मध्ये 60.48 kWh ची उच्च क्षमतेची बॅटरी आहे. ही कार फास्ट चार्जिंग मोडमध्ये 50 मिनिटांत 0%-80% पर्यंत चार्ज होते. याशिवाय फक्त 7.3 सेकंदात 0-100km/h पर्यंत आपला वेग वाढवू शकते.

BYD ATTO 3

 ई-प्लॅटफॉर्म 3.0 –

BYD-ATTO 3 हे ई-प्लॅटफॉर्म 3.0 वर भारतात तयार केलेले पहिले मॉडेल आहे, जे ब्लेड बॅटरी, 8-इन-1 इलेक्ट्रिक पॉवरट्रेन आणि अत्यंत एकात्मिक डोमेन कंट्रोलर्ससह शुद्ध इलेक्ट्रिक वाहनांच्या पुढील पिढीसाठी डिझाइन केलेले आहे. हा प्लॅटफॉर्म जगातील पहिली 8-इन-1 इलेक्ट्रिक पॉवरट्रेन आहे.

BYD ATTO 3

अन्य वैशिठ्ये-

या इलेक्ट्रिक SUV मध्ये मोबाईल फोन वायरलेस चार्जिंग, वन-टच इलेक्ट्रिक कंट्रोल टेलगेट, NFC कार्ड की, 8-स्पीकर ऑडिओ सिस्टम, इलेक्ट्रिक सीट ऍडजस्टमेंट, व्हॉईस कंट्रोल, एलईडी हेडलॅम्प, एलईडी रिअर लाइट, मल्टी-कलर ग्रेडियंट अॅम्बियंट लाइटिंग, PM 2.5 एअर फिल्टर, CN95 एअर फिल्टर असे दमदार फीचर्सही मिळतात.

हे पण वाचा : 

First Ethanol Car Launched : इथेनॉलवर चालणारी पहिली कार भारतात लाँच; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Tata Tiago EV : या इलेक्ट्रिक गाडीने घातला धुमाकूळ !!! 1 दिवसात मिळाले तब्ब्ल 10 हजार बुकिंग

Tata Nexon EV Jet : Tata Nexon EV जेट एडिशन भारतात लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Mercedes-Benz EQS 580 : मर्सिडीजची नवी इलेक्ट्रिक सेडान भारतात लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

TATAची ही कार 1100 रुपयांत धावणार 1 हजार किमी; उद्यापासून बुकिंग सुरु