परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने रिकाम्या झालेल्या परभणी मनपाच्या एका जागेसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. यावेळी सकाळपासून मतदानाला येणाऱ्यां नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद दिसत असून दुपारनंतर मतदार मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी येतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
परभणी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ अ मधील नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने, या ठिकाणी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. या रिक्त एका जागेसाठी गुरुवार दि ६ फेब्रुवारी सकाळपासून २० मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. एका जागेसाठी होत असलेल्या या निवडणुकीमध्ये, विविध पक्षाचे पाच उमेदवार मैदानात असून, १५२५४ मतदार यांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत. सकाळपासून मतदान केंद्रांवर अत्यल्प प्रतिसाद मिळत असून, दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.