CAA PROTEST, द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांच्यासह आठ हजार जणांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, हॅलो महाराष्ट्र : चेन्नई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध देशभर आंदोलन सुरु आहेत..नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या विरोधात द्रमुक आणि मित्रपक्षांनी सोमवारी चेन्नईत भव्य मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांची परवानगी न घेता काढल्यामुळे द्रमुकचे नेते एम.के. स्टालिन यांच्यासह आठ हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम देखील सहभागी झाले होते. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तमिळनाडू राज्यात अण्णाद्रमुक पक्षाची सत्ता आहे.जोपर्यंत केंद्र सरकार हा कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आमचे सरकारविरुद्ध आंदोलन सुरूच राहील असे द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टालिन यांनी म्हंटले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या विरोधात देशभर आंदोलन होत असून काही राज्यांनी एनआरसी व नागरिकत्व दुरुस्ती कायदा राज्यात लागू करण्यास नकार दिला आहे. आज पश्चिम बंगालमध्ये देखील या कायद्याच्या विरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.