नवी दिल्ली । शेतकर्यांच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले आंदोलन तीव्र होत असताना, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गहू, हरभरा, मसूर, मोहरीसह सर्व रब्बी पिकांचे किमान समर्थन मूल्य (MSP Hike) वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन MSP रब्बी पिकांच्या मार्केटिंग सीजन 2022-23 साठी लागू होईल. कोणत्या पिकासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने किती मार्केटिंग वाढवली आहे ते जाणून घ्या.
कोणत्या उत्पादनावर सरकारने MSP किती वाढवली?
मार्केटिंग वर्ष 2022-23 साठी मंत्रिमंडळाने गव्हाच्या MSP मध्ये प्रति क्विंटल 40 रुपयांची वाढ करून 2015 रुपये केली आहे. याशिवाय हरभऱ्याची MSP 130 रुपयांनी वाढवून 5,100 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. यावेळी तेलबियांमध्ये जास्तीत जास्त वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मोहरीच्या MSP मध्ये प्रति क्विंटल 400 रुपयांनी वाढ करून 4,650 रुपये करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर मसूरही 400 रुपयांनी वाढून 5,100 रुपये प्रति क्विंटल झाली आहे.
Union Cabinet approves MSP for rabi crops for marketing season 2022-23: Govt of India
— ANI (@ANI) September 8, 2021
खर्चाच्या बदल्यात शेतकऱ्यांना किती फायदा होईल ?
केंद्र सरकारने सूर्यफुलाचा MSP 114 रुपये प्रति क्विंटल वाढवून 5,327 रुपये प्रति क्विंटल केला आहे. केंद्र सरकारच्या मते, रब्बी पिकांच्या मार्केटिंग वर्ष 2022-23 साठी केलेली वाढ 2018-19 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांनुसार आहे. तेव्हा सरकारने जाहीर केले होते की, पिकांसाठीची किमान आधारभूत किंमत ही किमतीच्या किमान दीडपट इतकी केली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला रास्त भाव मिळेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल. अंदाजानुसार, MSP वाढवल्यानंतर शेतकऱ्यांना मोहरीच्या किंमतीचा 100% लाभ मिळेल. त्याचवेळी, खर्चाच्या 79 टक्के मसूर, 74 टक्के हरभरा आणि 50 टक्के सूर्यफुलावर उपलब्ध असेल.