Cabinet Decisions: टेलीकॉम क्षेत्रासाठी दिलासा, 100 टक्के FDI मंजूर

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी PLI योजना मंजूर करण्याव्यतिरिक्त, सरकारने टेलीकॉम क्षेत्रात 100% FDI ला परवानगी दिली आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली.

वैष्णव म्हणाले की,”आज टेलीकॉम क्षेत्राच्या ऑटोमेटिक रूटमध्ये 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने एकूण 9 संरचनात्मक सुधारणांना मंजुरी दिली आहे. याशिवाय 5 प्रक्रिया सुधारणांना मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय टेलिकॉम कंपन्यांना एडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू अर्थात AGR पेमेंटवर 4 वर्षांची सवलत देखील मिळेल.

याशिवाय, सर्व कर्जबाजारी टेलीकॉम क्षेत्राला दिलासा देत, केंद्रीय मंत्रिमंडळाने टेलीकॉमद्वारे स्पेक्ट्रम पेमेंट भरण्यास स्थगिती मंजूर केली आहे. टेलीकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रम शुल्क आणि AGR पेमेंटसंदर्भात 4 वर्षांची स्थगिती दिली जाईल.

You might also like