सरकारकडून झेंडावंदनाची यादी जाहीर! कोणता नेता कोणत्या जिल्ह्यात उपस्थित राहणार?

shinde, fadanvis, pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा स्वातंत्र्य दिन (Independence Day) अवघ्या 4 दिवसांवर आला आहे. यानिमित्ताने राज्यात जोरदार तयारीला सुरुवात ही झाली आहे. मुख्य म्हणजे राज्यात नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यामुळे राज्य सरकारने देखील स्वातंत्र्यदिनासाठी काही खास योजना आखल्या आहेत. दरवर्षी राज्यात स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांकडून झेंडावंदन करण्यात येते. मात्र यावर्षी पालकमंत्री निश्चित न झाल्यामुळे राज्य सरकारने झेंडावंदन करण्यासंदर्भात यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मंत्रिमंडळातील वेगवेगळ्या मंत्र्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन झेंडावंदन करण्याचा मान देण्यात आला आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार, पालघरमध्ये झेंडावंदन करण्याचा मान मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर येथे झेंडावंदन करणार आहेत. तसेच, देवेंद्र फडणवीस नागपूर मध्ये झेंडावंदनासाठी उपस्थित राहतील. त्याचबरोबर छगन भुजबळ अमरावतीत, सुनील मुनगंटीवार चंद्रपूरमध्ये, चंद्रकांत पाटील पुण्यामध्ये, दिलीप वळसे पाटील वाशिम मध्ये ,राधाकृष्ण विखे पाटील नगरमध्ये, गिरीश महाजन नाशिकमध्ये, दादा भुसे धुळ्यात झेंडावंदनासाठी उपस्थित राहणार आहेत.

इतकेच नव्हे तर, गुलाबराव पाटील जळगावमध्ये, रवींद्र चव्हाण ठाण्यामध्ये, हसन मुश्रीफ सोलापूरमध्ये, दीपक केसरकर सिंधुदुर्गमध्ये, उदय सामंत रत्नागिरीत, अतुल सावे परभणीत, संदिपान भुमरे औरंगाबाद, सुरेश खाडे सांगली, विजयकुमार गावित नंदुरबारमध्ये, तानाजी सावंत उस्मानाबादमध्ये, शंभूराजे देसाई साताऱ्यात, अब्दुल सत्तार जालनामध्ये, संजय राठोड यवतमाळ, धनंजय मुंडे बीड, धर्मराव अत्राम गडचिरोली, मंगलप्रभात लोढा मुंबई उपनगर, संजय बनसोडे लातूर या ठिकाणी झेंडावंदन करतील.

यानंतर, बुलढाणा येथे झेंडावंदन करण्याचा मान अनिल पाटील यांना देण्यात आला आहे. तसेच आदिती तटकरे पालघर येथे झेंडावंदन करतील. रायगडमध्ये तेथील जिल्हाधिकारीच झेंडावंदन करतील. तसेच हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा , अकोला, नांदेड या सर्व ठिकाणी तेथील जिल्हा अधिकारी झेंडावंदन करतील. यासोबत, अप्पर आयुक्त यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन येथील झेंडावंदन करण्यात येईल.