शिवसेनेकडून तहसिलदारांना केक : बेकायदेशीर बांधकाम पाडण्याच्या आदेशाला वर्षपूर्ती तरी कारवाई नाही

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यातील मौजे कारंडवाडी येथील गट नंबर 119 या जागेचा दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित आहे. तरी कोर्टाचा अवमान करून बेकायदेशीर बांधकाम परवानगी केले आहे. सदरचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे आदेश देऊन सुद्धा अद्याप यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

सातारा तहसीलदार यांच्याकडून कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सातारा शिवसेनेच्या वतीने सातारा तहसीलदारांना केक देऊन अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. बांधकाम पाडण्याचा आदेश काढून वर्षपूर्ती झाली. तरी देखील सातारा तहसीलदारांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप यादरम्यान शिवसेनेने केला आहे.

तसेच कोर्टाचा अवमान देखील केला गेला असून संबंधित व्यक्तीवर येत्या 10 दिवसांत कायदेशीर कारवाई करून शासनाची फसवणूक केली आहे. तरी गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी दिला आहे.