होळी, धुळवडवरील निर्बंध मागे; गृह विभागाकडून नवी नियमावली जारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने होळी आणि धुळवड या सणांवर काही निर्बंध आणले होते. राज्य सरकारने होळी रात्री 10 च्या आत पेटवण्याचं बंधन घातलं होतं. तसंच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली होती. त्यावर जनतेने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता सरकार कडून हे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. गृह विभागाने त्याबाबत नवे परिपत्रक जारी केले असून त्यामुळे उत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यापूर्वी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद गृहविभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक नियमावलीत करण्यात आली होती. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ही नियमावली पाठवत या काटेकोर पालन करण्याचा आदेश देण्यात आला होते परंतु जनता आणि विरोधकांनी या निर्णयावरून नाराजी व्यक्त केल्यानंतर नवे नियम जारी करण्यात आले आहेत.

काय आहे नवी नियमावली?

कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतो गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणुक नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा.