हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा आवाज काढून थेट मुख्यमंत्री कार्यलयात एका पट्ट्याने फोन केला होता. फोन करून अमुक एक व्यक्तीची बदली अमुक ठिकाणी करा, असं थेट फर्मानच दिलं होतं. दरम्यान खरा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी संबंधित व्यक्तीला बेड्या ठोकल्या.
खुद्द शरद पवार साहेब फोन करत आहेत,असा प्रकार कधी होत नाही. त्यामुळे हा कॉल बोगस असल्याचं उघडकीस आल्यावर, मग मुंबईतील गावदेवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एक व्यक्तीला ताब्यात ही घेण्यात आलं आहे.
दरम्यान पुण्यातील चाकण मध्येही असाच प्रकार घडला आहे. धीरज धनाजी पठारे असं मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याचे साथीदार गुरव याने शरद पवार यांचा आवाज काढून खांडेभराड यांना पैशाची मागणी केली होती. त्यांना किरण काकडे याची ही साथ मिळाली होती. त्यांना 20 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय.