सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना जम्बो कोविड सेंटर उभे करायला सूचना केल्या होत्या. कोणीही कोविड सेंटर उभे केले नाही. आता साखर कारखान्यांना ऑक्सिजन फ्लॅन्ट उभे करायला सांगितले आहेत. लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नसतं, म्हणजे राज्यात तहान लागल्यावर आड काढण्याचा उद्योग चालू आहे. आता तुम्ही प्लॅन्ट केव्हा उभा करणार, कारखानदार ते उभे करणार नाहीत. पण माणसांचा ऑक्सिजन संपल्यावर, तुमचा ऑक्सिजन येणार आहे. त्यामुळे तुम्ही मुडद्यांना ऑक्सिजन देणार का असा प्रश्न शरद पवारांना रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
सातारा येथे जिल्हा कोविड रूग्णालयाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, गेल्या 7 ते 8 महिन्यापांसून आरोग्य यंत्रणा सुसज्ज करायला पाहिजे होती. मुख्यंमंत्र्यापासून सगळं मंत्रिमंडळ सांगत होत, दुसरी लाट मोठी येणार आहे. मग डीपीडीसीतील पैसे सत्ताधारी आमदारांनी वाटून नेले आपआपल्या मतदारसंघामध्ये तेच पैसे आरोग्यासाठी का वापरले नाहीत. पंचवीस पंधराचा फंड ग्रामविकासचा खात्याअंतर्गत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना रस्ते, गटाराच्या नावाखाली ठेकेदारांना पोसायला आणि टक्केवारी खायला वीस- वीस कोटी दिले. त्याऐवजी आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या असत्या, तर प्रत्यके जिल्ह्यातील जनतेचे चाललेल्या हालआपेष्टा राहिल्या नसत्या.
राज्यातील सत्ताधाऱ्यांनी शून्य काम केले. उठ की सूट प्रत्येकीवेळी केंद्राकडे बोट दाखवायचे. ऑक्सिजन, व्हेटींलेटर, वॅक्सिन केंद्राने द्यावे आणि आज केंद्राने जाहिर केले 18 ते 45 वयोगटातील सर्वांना वॅक्सिन मोफत देणार आहे. मग मुख्यमंत्र्यापासून सगळ म्हणतायतं आम्ही वॅक्सिन फुकट देणार आहे. राज्यातील जनता किड्या- मुग्या सारखी आैषधाविना मरत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा