हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकार (Cental Government) देशातील शेतकऱ्यांसाठी सतत वेगवेगळ्या योजना आणत असते. याच शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा ही मिळावा म्हणून सरकारकडून दोन महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनेमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) आणि पीएम किसान मानधन योजनेचा (PM Kisan Mandhan yojana) समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांचा लाभ एका शेतकऱ्याला एकत्रित घेता येऊ शकतो का? असा प्रश्न सतत विचारला जात आहे. याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
योजनेचे नियम काय सांगतात?
केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि किसान मानधन योजनेचा शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. सध्या संपूर्ण देशभरातील लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेताना दिसत आहेत. त्यामुळे या योजनांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लक्षात घ्या की, तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी केली असेल तर तुम्हाला थेट मानधन योजनेमध्ये सामील होता येऊ शकते. म्हणजेच एकाच वेळी तुम्ही दोन्ही योजनांचा लाभ घेऊ शकता. परंतु त्याकरता या योजनांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करण्याची आणि अर्ज भरण्याची आवश्यकता आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. म्हणजेच सरकार सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांचा निधी देते. हा निधी प्रत्येक चार महिन्याला 2 हजार रुपयांच्या टप्प्यांमध्ये दिला जातो. गेल्या 12 सप्टेंबर 2019 रोजी या योजनेला सुरुवात करण्यात आली होती. तेव्हापासून ते आजवर या योजनेत अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत.
पीएम किसान मानधन योजना
पीएम किसान मानधन योजना एक पेन्शन योजना आहे. या योजनेसाठी 18 ते 40 वयोगटातील शेतकरी अर्ज करू शकतात. तसेच या योजनेअंतर्गत दरमहा 55 ते 200 रुपये भरावे लागतात. त्यानंतर वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर सरकारकडून शेतकऱ्याला दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन दिली जाते. यामुळे शेतकरी कोणत्याही काम न करता पेन्शन घेऊन आपली आर्थिक गरज भागवू शकतात.