हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Canara Bank : सार्वजनिक क्षेत्रातील Canara Bank ने फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात बदल केला आहे. बँकेचे हे नवीन व्याजदर 16 जुलै 2022 (शनिवार) पासून लागू करण्यात आले आहेत.
Canara Bank कडून 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या विविध कालावधीसाठी एफडीची ऑफर दिली जाते. या बदलानंतर बँकेच्या ग्राहकांना 7 दिवसांपासून 45 दिवसांच्या एफडीवर 2.90 टक्के दराने व्याज मिळेल तर 46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के दराने व्याज मिळेल. याशिवाय 91 दिवस ते 179 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 4.05 टक्के दराने व्याज मिळेल.
असे असतील एफडीचे दर
Canara Bank च्या ग्राहकांना 180 दिवस ते 269 दिवसांच्या FD वर 4.50 टक्के दराने व्याज मिळेल. याशिवाय 270 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.55 टक्के, 333 दिवसांच्या FD वर 5.10 टक्के, 1 वर्षाच्या FD वर 5.30 टक्के, 1 वर्षांवरील आणि 2 वर्षांपेक्षा कमी FD वर 5.40 टक्के , 2 वर्षांपेक्षा कमी आणि 3 वर्षांवरील FD वर 5.45 टक्के, 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी FD वर 5.70 टक्के आणि 5 ते 10 वर्षांच्या FD वर 5.75 टक्के दराने व्याज असेल.
ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्याज दर
कॅनरा टॅक्स सेव्हर डिपॉझिट स्कीममध्ये सर्वसामान्यांना 5.75 टक्के व्याजदर मिळेल, तर ज्येष्ठ नागरिकांना 6.25 टक्के व्याजदर मिळेल. कॅनरा बँकेच्या वेबसाइटनुसार, एनआरओ/एनआरई आणि सीजीए डिपॉझिट्सव्यतिरिक्त, 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिट्स आणि 180 दिवस आणि त्याहून जास्त कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के जास्त व्याज दिले जातील. Canara Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://canarabank.com/User_page.aspx?othlink=9
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल !!! नवीन दर तपासा
Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या
DBS Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर
IRCTC : सावधान !!! रिफंडच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून केली जात आहे फसवणूक