DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । DBS Bank  : RBI कडून गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ करण्यात आली. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली आहे. या दरम्यानच आता DBS Bank ने देखील आपल्या काही कालावधीसाठीच्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे.

DBS Bank: 4.75 percent interest will be available on 1 year FD in this bank,  know 10 years return - Digit News

15 जुलैपासून DBS Bank चे नवे दर लागू झाले आहेत. बँकेने 2 कोटींपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. DBS बँकेकडून किमान 7 दिवस आणि जास्तीत जास्त 10 वर्षांच्या FD ऑफर केल्या जातात. बँकेने 181 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठी 20 ते 150 बेस पॉइंट्सने एफडी दर वाढवले ​​आहेत.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD  Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

आता DBS Bank मध्ये 181 दिवस ते 269 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 3.25 टक्के व्याज मिळेल तर 270 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी मुदतीच्या FD वर 4.75 टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, हा व्याज दर 1 वर्ष ते 375 दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.65 टक्के, 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 6 टक्के आणि 5 वर्षांपर्यंतच्या मुदतीच्या FD वर 6.75 टक्के असेल.

DBS Bank hikes FD rates by 20-150 bps. Check new interest rates here | Mint

अलीकडेच एसबीआय, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक, आयडीबीआय बँक इत्यादींनी देखील आपल्या FD वरील दरांमध्ये वाढ केली आहे. RBI कडून रेपो दरात वाढ झाल्यानंतर बँकाकडून हे दर वाढवण्याची प्रक्रिया सुरू झाली. DBS Bank

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.dbs.com/digibank/in/deposit/fixed-deposit/interest-rates.page

हे पण वाचा :

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

Axis Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ !!! नवीन दर तपासा

IRCTC : सावधान !!! रिफंडच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून केली जात आहे फसवणूक

YES Bank च्या ग्राहकांना मुदतीआधी FD बंद केल्यास द्यावा लागणार जास्त दंड !!!

SIP मध्ये होणारे नुकसान अशा प्रकारे टाळा !!!

Leave a Comment