हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Canara Bank : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील Canara Bank कडून नवीन वर्षात ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आता कॅनरा बँकेने मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 15 ते 25 बेस पॉईंटने वाढ केली आहे. आता MCLR वाढल्याने बँकेकडून होम, ऑटो आणि पर्सनल लोन घेणे महागणार आहे. रेपो रेट वाढवल्यानंतर अनेक बँकांनी MCLR वाढवला आहे.
Canara Bank च्या वेबसाइट वरील माहितीनुसार, 7 जानेवारी 2023 पासून हे नवीन व्याजदर लागू होतील. या बदलानंतर आता एक वर्षाच्या कालावधीसाठीचा स्टॅण्डर्ड MCLR 8.35 टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल. तसेच एक दिवस ते एक महिन्यापर्यंतच्या MCLR चा दर 7.50 टक्के, 3 महिन्यांचा MCLR वाढवून 7.85 टक्के आणि 6 महिन्यांसाठी MCLR दर 8.20 टक्के असेल.
जास्त EMI द्यावा लागणार
MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील.
MCLR काय असते ???
MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. Canara Bank
RBI ने रेपो दरात केली वाढ
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Canara Bank
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://canarabank.com/User_page.aspx?othlink=10
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे