हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शंभर कोटी वसुली प्रकरणामुळे अडचणीत आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका राज्य सरकारकडून मुंबई न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी आता 8 जून पासून होणार आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुली करण्याचा आरोप केला होता. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने तपास करून अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात बदल्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा, कट रचल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे या मुद्द्यांच्या अनुषंगाने लावलेली कलम रद्द करावीत या मागणीसाठी राज्य सरकारला मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. राज्य सरकारच्या याचिकेवर 8 जून रोजी सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या कोर्टात सुनावणी होईल.
काय आहे प्रकरण ?
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा शंभर कोटी रुपयांची वसुली चे टार्गेट ठेवल्याचा आरोप केला होता. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. या लेटर बॉम्ब मुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या दृष्टीने राजीनामा दिला. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले सीबीआय कडून अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला त्यांची चौकशी सुरू केली . या प्रकरणानंतर मात्र राजकीय गोटात एकच खळबळ उडाली. आता मात्र एकीकडे सीबीआय आणि एकीकडं ईडी देखील अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.