तुम्हीही प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी पिता? घरी, ऑफिसमध्ये जार मागवता? वेळीच सावध व्हा अन्यथा होऊ शकतो कॅन्सर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन सध्या उन्हाळा सुरु असल्याने भारतातील सर्वच प्रमुख शहरांत उष्णतेची लाट आली आहे. कडक उन्हातून आल्यानंतर थंडगार पाणी पिल्याशिवाय आपला जीव शांत होत नाही हे खरंच आहे. पण तुम्हीही तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये थंड पाण्याचा जार मागवता काय? प्रवासात असाल तर पाण्याची बाटली विकत घेता काय? जर याचे उत्तर हो असेल तर वेळीच सावध व्हा. ब्लास्टिकच्या बॉटल, प्लास्टिक कॅन यामुळे कॅन्सर सारखा भयावह आजार होण्याची शक्यता आहे.

नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार, तुम्ही प्लास्टिक जार/डब्बा किंवा प्लॅस्टिकची बॉटल यांच्यातील पाणी पिणे टाळणे गरजेचे आहे. प्लॅस्टिकच्या भांड्यातून मिळणारे विकतचे पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असू शकते. पाण्याचे हे डबे अनेक दिवस कडक उन्हात राहतात. प्लास्टिकचा अभ्यास करणार्‍या संशोधकांनी जास्त वेळ गरम ठिकाणी राहिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी न पिण्याची शिफारस केली आहे. संशोषकांच्या म्हणण्यानुसार, उष्णतेमुळे प्लास्टिकमधील रसायने पाण्यात मिसळण्यास मदत होऊ शकते. असे झाले तर प्लास्टिकमधील रसायने पाण्यावाटे आपल्या शरीरात जाऊन आपण कॅन्सर सारख्या आजाराला बळी पडू शकतो.

जर तुम्ही कडाक्याच्या उन्हामुळे वैतागला असाल अन जर त्याचवेळी समोर कोणी पाण्याने भरलेली प्लॅस्टिकची बाटली घेऊन आले तर ते पाणी पिण्यापुर्वी तुम्ही दोनदा विचार करणे गरजेचे आहे. सदर प्लास्टिक बाटली खूप वेळ उन्हात राहिलेली नसेल ना याची माहिती घेणे गरजेचे आहे. नॅशनल जिओग्राफिकच्या अहवालात असे म्हटले आहे की, प्लॅस्टिकच्या वस्तू त्यामध्ये असलेल्या पेयांमध्ये किंवा अन्नामध्ये अल्प प्रमाणात रसायने सोडतात. जसजसे तापमान आणि वेळ वाढत जातो, तसतसे प्लास्टिकमधील रासायनिक बंध अधिकाधिक तुटतात आणि रसायने बाहेर पडण्याची शक्यता असते.

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिण्याचे धोके कोणते?

डायऑक्सिन उत्पादन : तुम्ही जर प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिट असाल अन जर ती बाटली खूप वेळ उन्हामध्ये असले तर ती आरोग्याला धोका पोहोचवू शकते. थेट सूर्यप्रकाशातुन मिळणाऱ्या गरमीमुळे प्लास्टिकमधून डायऑक्सिन नावाचे विष बाहेर पडते जे सेवन केल्यावर स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.

बीपीए निर्मिती : प्लॅस्टिकच्या बाटलीत पाणी साठवल्याने बायफेनिल ए नावाचे रसायन तयार होते. हे एस्ट्रोजेनची नक्कल करणारे रसायन आहे ज्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, प्रजनन समस्या, वर्तणुकीशी संबंधित समस्या आणि मुलींमध्ये लवकर यौवन यासारख्या अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी साठवून न पिणे कधीही चांगले.

रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम : जेव्हा आपण प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पितो तेव्हा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर खूप परिणाम होतो. प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधली रसायने खाल्ली जातात आणि त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

यकृताचा कर्करोग आणि शुक्राणूंची संख्या कमी होणे : प्लास्टिकमध्ये फॅथलेट्स नावाचे रसायन असल्यामुळे, प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्याने यकृताचा कर्करोग आणि शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.

बाटलीबंद पाण्यात, विशेषतः लोकप्रिय ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण जास्त आहे असे फ्रेडोनिया येथील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कने अलीकडेच केलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे. मायक्रोप्लास्टिक्स हे 5 मिलीमीटर किंवा त्याहून लहान आकाराचे प्लास्टिकचे ढिगारे आहेत. मायक्रोप्लास्टिक हे 93 टक्क्यांहून अधिक बाटलीबंद पाण्यात आढळते आणि जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की मायक्रोप्लास्टिक्सच्या वापरामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो असे कोणतेही पुरावे नाहीत, तरीही हा चिंतेचा विषय आहे.

पाण्याची बाटली विकत घेण्यापूर्वी या ४ गोष्टी लक्षात घ्या –

पाण्याचे मोठे कंटेनर जास्त काळ उन्हात ठेवल्यास ते विकत घेऊ नका.
पाणी सावलीत ठेवल्याची खात्री करा आणि त्याचे तापमान 25-अंश असावे.
तुमची स्वतःची पाण्याची बाटली, ग्लास किंवा मेटलची बाटली सोबत बाळगा.
प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या विकत घेऊ नका.

Leave a Comment