50 वर्षाखालील व्यक्तींमध्ये कॅन्सरचे प्रमाण 79 % वाढले; काय आहेत यामागील कारणे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजकाल कधी कोणाला अचानक कॅन्सरचे (Cancer) निदान होईल सांगताच येत नाही. तरुण वयातच आपल्या आजूबाजूच्या लोकांना कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने ग्रासल्याचे बातम्याचे प्रमाण देखील वाढले आहे. 30 वर्षांत संपूर्ण जगातील 50 वर्षांखालील लोकांमध्ये जवळपास 79 टक्के कॅन्सरचे रुग्ण वाढल्याचं संशोधनातून उघड झालं आहे. तरुणांमध्ये वाढलेल्या कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचे प्रमाण का वाढले याची कारणे समजून घेणे गरजेचे आहे . ही कारणे कुठली ते पाहूया :

1) खराब जीवनशैली

खराब जीवनशैली आपल्याला महागात पडत आहे. खराब जीवनशैलीमुळे 30 टक्के तरुणांना कॅन्सर या आजाराने ग्रासलं असल्याचंही या अभ्यासातून समोर आलं आहे. 45 वर्षांखालील लोक देखील खराब जीवनशैलीमुळे या आजाराला बळी पडत आहेत. यासोबतच आपला चुकीचा आहार आणि जीवनशैलीमुळे पोटात गॅस होण्याचं प्रमाण आणि आतड्याचा कर्करोग होण्याचं प्रमाण वाढत आहे,

2) प्रदूषण ( Pollution )

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्यामागे प्रदूषण हे एक मोठं कारण असू शकतं. हवेवाटे सल्फर, कॅडमियम आणि कारखान्यातील प्रदूषण आपल्या शरीरात प्रवेश करते. कार्सिनोजेन्स (कर्करोगास कारणीभूत रसायन) देखील फुफ्फुसाचा कर्करोग आणि अनेक रोगांना कारणीभूत ठरू शकतो.

3) जंक फूड ( Junk food )

केमिकलयुक्त अन्नामुळे कर्करोग होतो, संशोधनातून समोर आलं आहे. केमिकलयुक्त अन्न खाल्ल्याने ते अवयव, रक्ताभिसरण, त्वचा आणि शरीरातील मऊ पेशींना त्रास देते आणि त्यामुळे त्यांचं कार्य बदलतं. आपल्या जीन्समध्ये बदल होत असतात, त्यामुळे देखील कर्करोग होऊ शकतो.

4) Radiation

अनेक आजाराचे निदान करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टेस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात U.V. radiation, अल्फा radiation, gamma radiation होणाऱ्या वापरामुळे त्यांच्या सानिध्यात राहण्याचे अधिक प्रमाणात वाढल्यामुळे cancer होण्याचे प्रमाण वाढत आहे.