Sunday, April 2, 2023

आणि धोनी पुन्हा परतला! असं झालं जंगी स्वागत.. व्हिडिओ व्हायरल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी गेल्या काही काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. पण त्याच्या चाहत्यांसाठी एक चांगली खुशखबर म्हणजे धोनी पुन्हा एकदा त्यांना मैदानात खेळताना दिसणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) ची सुरुवात 29 मार्चपासून होणार आहे. त्यानिमित्तानं चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी चेन्नईला पोहोचला आहे. धोनी सीएसके कॅम्पसाठी चेन्नईला पोहोचताच त्याचे जोरदार जंगी स्वागत करण्यात आले. चेन्नई एअरपोर्ट ते हॉटेलपर्यंत धोनीचे स्वागत कशारीतीने करण्यात आलं याचा व्हिडिओ सीएसकेच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. माही आजपासून आयपीएलसाठी सराव करताना मैदानात दिसणार आहे. धोनीच्या मैदानात परतण्याने गेली कित्येक दिवस हुरहूर लागून असलेल्या त्याच्या चाहत्यांची प्रतीक्षा मात्र आता संपली असंच म्हणावं लागेल.


View this post on Instagram

 

Every goose shall bump with First Day First Show feels! Just #StartTheWhistles! #HomeSweetDen 🦁💛

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on Mar 1, 2020 at 2:44pm PST

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

- Advertisement -