हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जनरल बिपीन रावत यांना झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे नुकतेच निधन झाले आहे. अपघातानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.
तमिळनाडू 8 डिसेंबरला झालेल्या लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेमधील बचावलेल्या वरुण सिंह हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर बेंगलूरू मधील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. मागील काही दिवस त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली आहे.
Group Captain Varun Singh, the lone survivor of #TamilNaduChopperCrash – who was under treatment at Command Hospital in Bengaluru – passes away at the hospital. pic.twitter.com/l8XsiihL5k
— ANI (@ANI) December 15, 2021
Mi-17V5 हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 जणांनी प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेत केवळ ग्रुप कॅप्टन वरुण सिंह वाचले होते. त्यांच्यावर बेंगळुरूच्या कमांड रुग्णालयात उपचार सुरु होते. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा प्रेरणादायी संदेश दिला होता. गेल्या वर्षी, वरुण सिंग तेजस विमान उडवत असताना त्यामध्ये एक मोठी तांत्रिक अडचण आली होती. पण एक भयानक अपघात टाळण्यासाठी धैर्य आणि बुद्धिमत्तेचे प्रदर्शन त्यांनी केले आणि त्यासाठी त्यांना ऑगस्टमध्ये शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.