पानशेत धरणात अपघाताने गाडी कोसळली; आईसह तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे| मोठ्या प्रमाणात रोड एक्सीडेंट दररोज घडत असतात. बऱ्याच वेळा या अपघातासाठी एकतर चालकाचे नियंत्रण सुटले हे कारण असते. तर काही वेळा याला खराब रस्ते आणि इतर काही कारणे असतात. नुकताच पुण्यातील रस्त्यावरील एक अपघात घडला आहे. यामध्ये चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी धरणामध्ये कोसळली. आणि यामध्ये आई आणि तीन मुलींचा पाण्यामध्ये पडून दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हा अपघात घडला. पुणे पानशेत रस्त्यावरून एक कुटुंब चार चाकी गाडीमधून पुण्याकडे जात होते. या वेळी खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. व गाडी पाण्यात कोसळली. वडिलांना पोहता येत असल्यामुळे ते पोहत पाण्याबाहेर आले. पण त्यांना आपल्या कुटुंबाला वाचविण्यात यश आले नाही.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले व गाडी बाहेर काढून तिन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढले. आईचा मृतदेह सापडत नव्हता. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोधकार्य पोलिसांनी चालू ठेवले. रात्री उशिरा आईचा मृतदेह सापडला. पुण्याच्या दिशेने कुटुंब जात असताना हा अपघात घडल्याचे, अपघातातून वाचलेल्या वडिलांनी सांगितले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group