हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून तर दोनजण गंभीर जखमी आहेत. ही अपघाताची घटना शुक्रवारी वैजापूर – कोपरगाव सीमेवरील धोत्रे शिवारात घडली आहे. या अपघातामुळे काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. जिला पुन्हा पोलिसांनी सुरळीत केले आहे.
अपघात कसा घडला? (Samruddhi Mahamarg)
शुक्रवारी रात्री साईबाबांच्या दर्शनासाठी काही भाविक शिर्डीला MH 21 BF 9248 या स्विफ्ट कारमधून समृद्धी महामार्गाद्वारे निघाले होते. याचवेळी वैजापूर-कोपरगाव सीमेजवळ असलेल्या तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायतीच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) एक कंटेनर उभा होता. या कंटेनरमधला एक चॅनेल खाली पडला होता. हा चॅनेल उचलत असतानाच जालन्याच्या दिशेने एक भर धावकार कंटेनरकडे आली. यातील कार चालकाला गाडीवर नियंत्रण मिळवता न आल्यामुळे ती थेट जाऊन कंटेनरला धडकली.
या भीषण अपघातामध्ये जालन्यामधील राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे या तिघांना जीव गमवावा लागला. तर फलके आणि वाघ हे दोघेजण जखमी झाले. आता त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्य म्हणजे, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी लगेच कारमध्ये असलेल्या सर्वांना बाहेर काढले. तसेच इतर तिघांच्या मृतदेहाला शविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठवले. (Samruddhi Mahamarg)