पुणे- अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे- अहमदनगर महामार्गावर रांजणगाव येथे ट्रक आणि कार मध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन लहान मुलांचादेखील समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कार मधील मयत कुटुंबीय नगरहून पनवेल येथे जाण्यासाठी निघाले होते. त्याच वेळी रांजणगाव एमआयडीतील एलजी कंपनीसमोर एक मोठा कंटेनर उलट दिशेने येत होता. चुकीच्या बाजुने आलेला कंटेनर अचानक रस्त्याच्या मध्ये आल्याने भरधाव जाणारी कार या ट्रकवर जोरात आदळली. या अपघात कारमधील पाच जण जागीच ठार झालेत.

अपघातात मृत पावलेल्या मध्ये तीन लहान मुलांचा समावेश असून, त्यांचे वय 14 वर्षे, 7 वर्षे आणि एक चार वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. दरम्यान, या भीषण दुर्घटनेनंतर संबंधित ट्रक चालक आणि त्याच्या सोबतच्या हेल्परने घटनास्थळावरून पोबारा केला आहे. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला असून पळून गेलेय चालकाचा शोध सुरु आहे.