हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car Loan : देशातील पर्सनल कारच्या वाढत्या मागणीमुळे वापरलेल्या कारच्या मागणीतही लक्षणीय वाढ झाली आहे. आता बहुतांश कार कंपन्याकडून देखील सेकंड हँड कार विकल्या जात आहेत. याशिवाय कंपन्या वापरलेल्या गाड्यांवर फायनान्सच्या सुविधाही देत आहेत. आता वापरलेल्या कार्सना शून्य डाऊन-पेमेंट पर्यायाने फायनान्स केला जाऊ शकेल, मात्र त्यासाठी जास्त व्याज दर द्यावा लागेल.
जर आपणही स्वस्त व्याजदरात Car Loan घेऊन सेकंड हँड कार खरेदी करायचा विचार करत असाल तर त्यासाठी काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत. ज्या फॉलो करून तुम्ही सेकंड हँड कारसाठी कमी व्याजदरात आणि सहजपणे फायनान्स मिळवू शकाल.
व्याजदराची तुलना करा
सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी बँक किंवा नॉन बँकिंग कंपनीकडून कर्ज घेता येऊ शकेल. मात्र, त्यासाठी जास्त व्याज द्यावे लागेल. प्री-ओन्ड कार लोन रेट सुमारे 10% पासून सुरू होतात, तर नवीन कारवरील लोन रेट सुमारे 7% इतके कमी असते. मात्र हा व्याजदर ग्राहकाची क्रेडिट हिस्ट्री आणि कारच्या प्रकारावरही अवलंबून असेल. त्यामुळे लोन घेताना व्याजदराची चांगली तुलना करणे महत्वाचे ठरेल. Car Loan
प्री-अप्रूव्ड लोनसह खरेदी करा कार
कार खरेदीसाठी प्री-अप्रूव्ड पर्सनल लोनची देखील निवड करू शकता. ज्या लोकांना सेकंड हँड खरेदीसाठी Car Loan घ्यायचे आहे त्यांनी आपल्या क्रेडिट प्रोफाइलवर उपलब्ध असणाऱ्या पर्सनल लोनसाठीच्या ऑफर तपासल्या पाहिजेत. पर्सनल लोन हे तुलनेने स्वस्त आहेत. क्रेडिट प्रोफाइलवर अवलंबून, खरेदीदारांना कर्जाची मोठी रक्कम, दीर्घ कालावधी आणि कमी व्याजदर मिळू शकतात.
टॉप अप लोन घेऊन खरेदी करा कार
ज्या ग्राहकांनी आधीच होम लोन घेतले असेल ते टॉप-अप होम लोन घेऊ शकतात. असे ग्राहक उर्वरित कर्ज कालावधी आणि थकित कर्जाच्या रकमेवर आधारित टॉप-अप होम लोन मिळवून दीर्घ कालावधीचा आणि कमी व्याजदरावर जास्त लोन मिळवू शकतात. Car Loan
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/used-car-loan.html
हे पण वाचा :
DBS Bank कडून ग्राहकांना मोठी भेट !!! FD वरील व्याजदरात केली पुन्हा वाढ
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल !!! नवीन दर पहा
Business Ideas : ‘या’ झाडांच्या लागवडीद्वारे मिळवा करोडो रुपये !!!
Moto G62 5G : 5000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा; Motorola च्या स्मार्टफोनची जोरदार चर्चा