हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । DBS Bank : RBI कडून गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ करण्यात आली. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली आहे. या दरम्यानच आता खासगी क्षेत्रातील डीबीएस बँकेने आपल्या ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. बँकेने FD वरील व्याजदरात पुन्हा वाढ करण्याची घोषणा केली आहे. 28 जुलै 2022 पासून बँकेचे नवीन दर लागू झाले आहेत. याआधीही बँकेने 15 जुलै 2022 रोजी व्याजदरात वाढ केली होती.
0.50% पर्यंत वाढ
DBS Bank ने 2 कोटींपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने FD व्याजदर 50 bps ने वाढवले आहेत म्हणजेच निवडक कालावधीवर 0.50 टक्क्यांपर्यंत. DBS बँकेत किमान 7 दिवस आणि जास्तीत जास्त 10 वर्षांच्या FDs ऑफर केल्या जातात.
असे असतील नवीन व्याजदर
DBS Bank त किमान 7 दिवस आणि जास्तीत जास्त 10 वर्षांच्या FDs ऑफर केल्या जातात. DBS वेबसाइटनुसार, 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर साधे व्याज दर दिले जातील. 6 महिने किंवा त्याहून अधिक मुदतीच्या FD साठी, तिमाही आधारावर चक्रवाढ व्याज दिले जाईल.
7 दिवस – 2.50 टक्के
8 ते 14 दिवस – 2.75 टक्के
15 ते 29 दिवस – 2.75 टक्के
30 ते 45 दिवस – 2.75 टक्के
46 ते 60 दिवस – 2.75 टक्के
61 ते 90 दिवस – 3.00 टक्के
91 ते 180 दिवस – 3.00 टक्के
181 ते 269 दिवस – 4.75 टक्के
270 ते एक वर्षापेक्षा कमी – 4.75 टक्के
375 दिवस ते वर्ष – 5.75 टक्के
376 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी – 6.00 टक्के
2 वर्षे ते 2 वर्षे ते 6 महिन्यांपेक्षा कमी – 6.50 टक्के
2 वर्षे 6 महिने – 6.50 टक्के
2 वर्षे 6 महिने 1 दिवस ते 3 वर्षांपेक्षा कमी – 6.50 टक्के
3 वर्षे ते 4 वर्षांपेक्षा कमी – 6.25 टक्के
4 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी – 6.25 टक्के
5 वर्षे आणि त्याहून जास्त – 6.25 टक्के
अनेक बँकांनी एफडीचे दर वाढवले आहेत
अलीकडेच एसबीआय, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक, आयडीबीआय बँक इत्यादींनी देखील आपल्या FD वरील दरांमध्ये वाढ केली आहे. RBI कडून रेपो दरात वाढ झाल्यानंतर बँकाकडून हे दर वाढवण्याची प्रक्रिया सुरू झाली. DBS Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.dbs.com/in/treasures/common/interest-rates.page
हे पण वाचा :
Business Ideas : ‘या’ झाडांच्या लागवडीद्वारे मिळवा करोडो रुपये !!!
Moto G62 5G : 5000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा; Motorola च्या स्मार्टफोनची जोरदार चर्चा
आता 17 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनाही Voter ID साठी अर्ज करता येणार !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज जोरदार उसळी !!! नवीन दर पहा