हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Card Payment : आजकाल अनेक आर्थिक व्यवहार हे कार्डच्या माध्यमातून केले जातात. कार्डद्वारे पेमेंट करण्यात होणाऱ्या सुलभतेमुळे त्याचा प्रसार देखील खूप वाढला आहे. यामुळेच बँकाकडूनही ग्राहकांना एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड सारख्या सुविधा पुरवल्या जातात. या कार्डांमुळे, पैसे काढणे तसेच खरेदी करणेही खूप सोपे होते.
मात्र अजूनही अशी अजूनही अनेक लोकं आहेत जे एटीएम कार्ड, डेबिट आणि क्रेडिट कार्ड हे एकसारखेच असल्याचा विचार करतात. मात्र प्रत्यक्षात त्या प्रत्येकाचे काम वेगवेगळे असते. आपण क्रेडिट कार्डच्या जागी एटीएम कार्डचा वापर करु शकत नाही. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डने करता येणारी सर्व कामे देखील डेबिट कार्डद्वारे करता येत नाहीत. Card Payment
एटीएम कार्ड कसे काम करते ???
एटीएम कार्डचा वापर केवळ हा एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी केला जातो. एटीएम कार्ड हे आपले करंट अकाउंट किंवा बँकेच्या बचत खात्याशी जोडले गेलेले असते. ते फक्त एटीएम मशिनमध्येच वापरता येते. त्याद्वारे बँकेच्या ग्राहकांना कर्ज दिले जात नाही. तसेच जर जवळपास एटीएम मशीन नसेल तर पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करता येणार नाही. Card Payment
डेबिट कार्ड कसे काम करते ???
डेबिट कार्ड हे एटीएम कार्डप्रमाणेच आहे. यात मास्टरकार्ड, रुपे किंवा व्हिसा यांचा लोगो असतो. हे प्रामुख्याने दोन गोष्टी करते. हे एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी तसेच ऑनलाइन पेमेंट आणि डेबिट कार्ड स्वीकारणाऱ्या ठिकाणी देखील वापरले जाते. यामध्ये ग्राहकांना क्रेडिट कार्डप्रमाणे व्याज द्यावे लागत नाही. Card Payment
क्रेडिट कार्डद्वारे क्रेडिट मिळते
हे लक्षात घ्या कि, बँका आपल्या सर्वच ग्राहकांना क्रेडिट कार्डची सुविधा देत नाही. याद्वारे आपल्या खात्यात पैसे नसतानाही क्रेडिट कार्ड वापरून खरेदी, ऑनलाइन पेमेंट आणि इतर खर्च करता येतात. मात्र, यावर व्याज भरावे लागते. तसेच ते बँक खात्याशी जोडले गेले नसल्याने एटीएममधून पैसे काढण्यासाठी ते वापरता येत नाही. त्याच वेळी, ऑनलाइन पेमेंटसह, ज्या ठिकाणी रुपे, मास्टर आणि व्हिसा कार्ड स्वीकारले जातात त्या ठिकाणी देखील याचा वापर केला जातो. Card Payment
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/credit-card.html
हे पण वाचा :
एकदिवसीय क्रिकेटमधील Ben Stokes च्या ‘या’ 5 सर्वोत्तम खेळी !!!
Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील FD वरील व्याजदरात केली वाढ !!!
SBI ने ग्राहकांसाठी सुरु केली Whatsapp बँकिंगची सुविधा !!!
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!