Cardless Cash Withdrawal : आता डेबिट कार्ड नसतानाही ATM मधून काढता येतील पैसे, कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cardless Cash Withdrawal : कोणत्याही बँकेच्या डेबिट कार्डद्वारे एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची सुविधा दिली जाते. मात्र, आता सध्याच्या डिजिटल काळात अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. यामुळे आता आपल्याकडे कार्ड नसतानाही एटीएम मशीनमधून पैसे काढता येतील. म्हणजेच जर आपण एटीएम कार्ड घरीच विसरला असाल तरीही आपल्याला एटीएममधून अगदी सहजपणे पैसे काढता येतील.

How to withdraw cash from ATMs using UPI: Cardless cash withdrawal  explained | Mint

जर आपल्याकडे Google Pay, Amazon Pay, BHIM, Paytm, PhonePe यांसारखे UPI Apps असतील तर आपण डेबिट कार्डशिवाय एटीएममधून सहजपणे पैसे काढू शकाल. मात्र, UPI द्वारे कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा सध्या फक्त काही निवडक बँकांच्या एटीएममध्येच उपलब्ध आहे. यामध्ये एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमचा समावेश आहे. Cardless Cash Withdrawal

OCBC customers can now withdraw cash from an ATM without their ATM card -  HardwareZone.com.sg

UPI Apps द्वारे अशा प्रकारे काढा एटीएममधून पैसे

>> एटीएम मशीनमध्ये गेल्यानंतर स्क्रीनमध्ये Cash Withdrawal चा पर्याय निवडा.
>> आता स्क्रीनमध्ये UPI चा पर्याय निवडा.
>> यानंतर एक QR कोड येईल.
>> आता आपल्या मोबाईलमध्ये UPI App उघडा आणि QR कोड स्कॅन करा.
>> आता रक्कम टाका. (या सुविधेद्वारे एकावेळी जास्तीत जास्त 5000 रुपये काढता येतील)
>> UPI पिन एंटर करा आणि नंतर Proceed वर टॅप करा.
>> आता एटीएम मशीनमधून कॅश मिळेल. Cardless Cash Withdrawal

RBI Introduces Cardless Withdrawals At ATMs Via UPI

UPI म्हणजे काय ???

इथे हे जाणून घ्या कि, UPI ही एक रिअल टाइम पेमेंट सिस्टीम आहे. याद्वारे एका बँकेच्या खात्यामधून दुसऱ्या बँकेच्या खात्यामध्ये त्वरित पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी दिली जाते. तसेच UPI द्वारे, एकापेक्षा जास्त बँकांची खाती UPI Apps शी लिंक करता येतील. त्याच वेळी, एका UPI App द्वारे अनेक बँकांची खाती देखील ऑपरेट करता येतील. याची खास बाब अशी कि, आपल्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, UPI आयडी यापैकी एकच माहिती असली तरीही UPI मनी ट्रान्सफरची सुविधा देते. Cardless Cash Withdrawal

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.npci.org.in/what-we-do/upi/product-overview

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, ​​कर्जावरील व्याजदरात केली वाढ