Cardless Cash Withdrawl : आता डेबिट-क्रेडिट कार्डशिवाय काढता येणार कॅश, संपूर्ण प्रक्रिया पहा

Cardless Cash Withdrawal
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील सर्व ATM मध्ये Cardless Cash Withdrawl सुरू करण्याचा प्रस्ताव RBI ने नुकताच दिला आहे. यासाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरले जाईल. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काही दिवसांपूर्वीच कार्डलेस पैसे काढण्याची सर्व्हिस जाहीर केली होती. दास यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीच्या आपल्या पहिल्या आर्थिक धोरणात म्हटले आहे की, आता UPI वापरून सर्व बँका आणि ATM नेटवर्कवर कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा देण्याचा प्रस्ताव आहे.

कार्डलेस कॅश विथड्रॉवल विषयी जाणून घ्या

सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाले तर याद्वारे कोणालाही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड न वापरता ATM मधून पैसे काढता येतील. कॅशलेस ट्रान्सझॅक्शन कसे काम करतील याविषयी भारतातील फायनान्शियल सर्व्हिसेस एक्सेंचरच्या लीड सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की,”ATM वर लवकरच UPI वापरून पैसे काढण्याचा पर्याय दिसून येईल. कुलकर्णी यांनी ATM मधून Cardless Cash Withdrawl चे दोन मार्ग सांगितले, मात्र त्यासाठीची प्रोसेस कशी असेल हे अजूनही फारसे स्पष्ट झालेले नाही.

How To Withdraw Cash From Atms Using Upi: Cardless Cash Withdrawal Explained | Mint

UPI वापरून ATM द्वारे कार्डलेस पैसे काढण्याची प्रोसेस नंबर 1

ग्राहकाला ATM टर्मिनलवर रिक्वेस्ट केलेल्या डिटेल्स द्यावे लागेल.
त्यानंतर ATM क्यूआर कोड जनरेट होईल.
त्यानंतर ग्राहक UPI App वापरून QR कोड स्कॅन करेल आणि रिक्वेस्ट स्वीकारेल.
त्यानंतर ATM मधून पैसे काढले जातील.

All about cardless atm transactions

UPI वापरून ATM द्वारे कार्डलेस पैसे काढण्याची प्रोसेस नंबर 2

युझर्सना ATM टर्मिनलवर आपला UPI आयडी आणि पैसे काढण्याची रक्कम एंटर करावी लागेल.
त्यानंतर युजर्सना UPI App वर रिक्वेस्ट मिळेल.
त्यांना सध्याच्या UPI ​​App पासवर्ड वापरून ट्रान्सझॅक्शनला परवानगी द्यावी लागेल.
ऑथेंटिकेशन सक्सेसफुल नंतर ATM मध्ये कॅश दिली जाईल. Cardless Cash Withdrawl

Cardless ATMs: the new trend to dominate in 2020?

 

अधिक माहितीसाठी RBI च्या वेबसाईटला भेट द्या : https://m.rbi.org.in/scripts/FAQView.aspx?Id=75

 

हे पण वाचा :

UPI : आता इंटरनेटशिवाय करता येईल UPI Payment, अशी आहे संपूर्ण पद्धत

UPI द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्वाच्या टिप्स

Google वर चुकूनही सर्च करू नका ‘या’ 3 गोष्टी, अन्यथा जावे लागेल थेट तुरुंगात

Google Play Store Policy : आजपासून ‘कॉल रेकॉर्डिंग’ चे सर्व App होणार बंद

JioPOS Lite App : Jio Recharge द्वारे घर बसल्या पैसे कमावण्याची संधी !!!