नवी दिल्ली । दिग्गज आयटी कंपनी ओरॅकल इंडिया (Oracle India) चे प्रमुख आणि त्याच्या पत्नीविरूद्ध ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की,”त्यांनी ओरॅकल इंडियाचे कंट्री हेड प्रदीप अग्रवाल (Pradeep Agarwal) आणि त्यांची पत्नी मीनू अग्रवाल (Meenu Agarwal) यांच्याविरोधात आईपीसी कलम 406, 420, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांना सोमवारी त्यांच्या गुरगाव येथील घरी नोटिस दिली.
ओरॅकल कंपनीतील प्रोजेक्टच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून पैसे घेतल्याचा आरोप या दोघांवर आहे. पोलिसांनी सांगितले की,”एमएडीएस क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड ही गुरूगांवस्थित मीनू अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक इंटिरियर कंपनी आहे. ज्यांनी दिल्ली एनसीआर आणि आसपासच्या ग्राहकांना हेवी अॅडव्हान्स प्रोजेक्टच्या नावाखाली पैसे घेतले पण खराब काम केले आणि न कळवता साइट सोडली.
प्रदीप अग्रवाल आणि त्यांची पत्नी ग्राहकांना गुंतवणूकीसाठी ओरॅकल इंडियाचे स्थान आणि प्रतिष्ठेचा फायदा घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. इतकेच नव्हे तर असे म्हटले जाते की, मीनू अग्रवाल यांनी पैशाची मागणी करणाऱ्या ग्राहकांना लैंगिक छळ आणि खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अडचणीत आणण्याची धमकी दिली होती.
वेबसाइटवर मोठे दावे
आरोपी मीनू अग्रवालची वेबसाइट खूप चांगली आहे. येथे तिने 50 हजाराहून अधिक घरांचे इंटिरियर डिझाइन केल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर ती तिच्या कंपनीचे गुडगावमधील सर्वोत्कृष्ट इंटिरियर कंपनी म्हणून वर्णन करते. ग्राहकांना भरवसा देण्यासाठी त्यांनी वेबसाइटवर ग्राहकांचे रिव्यूही अपडेट केले आहेत, ज्यात कंपनी आणि मीनू अग्रवाल यांचे खूप कौतुक झाले आहे.
येथे गुडगाव मधील ऑफिस आहे
मीनू अग्रवाल यांच्या कंपनी वेबसाइट https://madscreations.in/ नुसार तिला इंटिरियर डिझायनिंगच्या क्षेत्रात 17 वर्षांचा अनुभव आहे आणि तिचे ऑफिस गुरगावच्या सेक्टर 48 मधील विपुल ट्रेड सेंटर सहना रोड येथे आहे. कंपनीला क्रिएटिव्ह हेड, ब्रँड मॅनेजर, प्रोजेक्ट हेड, फॅक्टरी मॅनेजर म्हणून डिजिटल मार्केटींग आणि अकाउंटिंग आणि अॅडमिन यांची नेमणूक करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा