बिगबाॅस फेम अभिजीत बिचुकलेवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मतदान केंद्रावर होमगार्डला शिवीगाळ केल्याप्रकरणी बिगबाॅस फेम अभिजीत बिचुकलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली. अभिजीत बिचुकले जावळी विधानसभा आणि वरळी विधानसभेचे अपक्ष उमेदवार आहेत.

ते मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी गेले असता तिथं एका होमगार्डची आणि बिचुकले यांच्यात वाद झाले. त्यावरूनच बिचुकलेने त्या होमगार्डला शिवीगाळ केली. त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. काल राज्यात विधानसभेसाठी मतदान घेण्यात आले होते. त्याच अनुषंगाने बिचुकले कालआपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आले असता त्यांची संबंधित होमगार्डशी बाचाबाची झाली.

Leave a Comment