सोलापूर प्रतिनिधी । सोलापुरातल्या बार्शीचे माजी आमदार आणि भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत यांनी भाजपचे स्थानिक नेते राजेंद्र मिरगणे यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली होती. मिरगणे हे युतीधर्म पाळून दिलीप सोपल यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे राऊत संतापले आणि मिरगणेंवर टीका करताना त्यांची जीभ घसरली होती. आणि या सर्वांमध्ये स्वतःला छत्रपती म्हणून ही उल्लेख केला होता, त्यामुळे महिलांच्या भावना दुखावल्या होत्या.
या विरोधात आज राजेंद्र मिरगणे यांनी तक्रार केल्यानंतर वैराग पोलीस स्टेशन मध्ये राजेंद्र राऊत यांच्यावर भारतीय दंड संहिता अन्वये सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाष्य करणे, महिलांच्या सन्मानास ठेच पोहचवणे आदी कलमांनुसार गुन्ह्यांची नोंद झाली करण्यात आली. राजेंद्र राऊत यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सर्व महिलांनकडून मोर्चा काढला जाणार आहे.
दरम्यान राऊत प्रमाणेच केंद्रीय मंत्री दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी देखील खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्याचाही सर्वच स्तरांतून निषेध नोंदवण्यात येत आहे.