औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या पेन्शन्स अदालतमध्ये अनेक तक्रारी दाखल झाल्या असून अद्यापही या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पेन्शनर्स कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली .
जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पेन्शन अदालत झाली. जिल्हा परिषदेच्या अनेक विभाग असताना फक्त आरोग्य आणि शिक्षण या दोनच खात्याच्या पेन्शनच्या प्रश्नावर चर्चा झाली. अन्य खात्याच्या प्रश्नावर निर्णय तर सोडाच पण चर्चा होऊ दिली नाही. त्यामुळे अनेक खात्यात पेन्शनर्स अत्यंत नाराज झाले आहेत आणि त्यांनी तशी नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. बांधकाम सिंचन पाणीपुरवठा आदी विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रश्न आणि समस्या मांडण्याची संधी त्याठिकाणी मिळाली नाही.
त्यातच शिक्षण विभागाची प्रमुख अनुपस्थित राहिले. त्यामुळे शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी मांडलेले प्रश्न अनुत्तरितच राहिले. यावेळी ओप्पो मुख्यकार्यकारी अधिकारी बनसोडे जिल्हा आरोग्य अधिकारी आनंद किती पेन्शनर संघटनेचे मराठवाडा एस आर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष वसंत सबनीस, उपाध्यक्ष रखमाजी जाधव, वैजापूरचे उपाध्यक्ष धोंडीरामसिंह राजपूत, त्रिमुख शिरोळे सुदामा गोंधळी, बावस्कर आदींची उपस्थिती होती.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.