हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कोणत्याही व्यक्तीला बँकेमधून पैसे काढण्यासाठी किंवा पैसे जमा करण्यासाठी बँकेत जावे लागत होते. परंतु, आता कोणत्याही ग्राहकांना दरवेळी रोख रक्कम जमा करण्यासाठी बँकेत जावे लागणार नाही. कारण, आता लवकरच आरबीआय थेट UPI च्या माध्यमातून एटीएम मशीनमधून (ATM Machine) रोख रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ही सुविधा नेमकी केव्हापासून लागू होईल याबाबत आरबीआयने (RBI) कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र या सेवेमुळे रोख रक्कम जमा करण्यासाठी UPI चा वापर करता येणार आहे.
आजवर अनेक बँकांनी कार्डलेस डिपॉझिटची सुविधा आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. परंतु आरबीआयने एक पाऊल पुढे टाकत ग्राहकांसाठी UPI द्वारे रोख रक्कम जमा करण्याची सुविधा आणली आहे. याबाबत आरबीआयकडून नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयच्या या सुविधेअंतर्गत एटीएम स्क्रीनवर UPI/QR कोडचा पर्याय दिला जाईल. यातील एका पर्यायावर क्लिक केल्यानंतर संबंधित बँकेची माहिती तेथे भरावी लागेल. पुढे एटीएम मशीनमध्ये जमा करायची असलेले रोख रक्कम भरावी लागेल.
मुख्य म्हणजे, ही सुविधा ग्राहकांच्या नेमकी कधी सेवे येईल याबाबत कोणतीही माहिती आरबीआयकडून देण्यात आलेली आहे. परंतु ही सुविधा ग्राहकांच्या सेवेत आल्यानंतर यामुळे बँकांवरील ताण कमी होणार आहे. तसेच यामुळे ग्राहकांचा देखील वेळ वाचणार आहे. कारण, एखादी रोख रक्कम जमा करण्यासाठी ग्राहकांना सतत बँकेत जावे लागणार नाही. सध्या संपूर्ण देशभरामध्ये UPI चा वापर वाढत चाललेला आहे. या पार्श्वभूमीवरच UPI ला घेऊन हे खास सुविधा ग्राहकांच्या सेवेत आणण्यासाठी आरबीआयने पाऊल उचलले आहे.