हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज काँग्रेस पक्षाचा 139 वा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने नागपूरमध्ये वर्धापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. “आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करणार” असे आश्वासन राहुल गांधी यांच्याकडून देण्यात आले आहे.
कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ” ही लढाई विचार आणि सत्तेची आहे. परंतु आमचे सरकार आल्यानंतर सर्व परिस्थिती बदलेल. शिक्षण, बेरोजगारी आणि स्थिरता यावर आमचं सरकार लक्ष देईल तसेच देशात आमचं सरकार आल्यानंतर जातनिहाय जनगणना करेल” यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. “नरेंद्र मोदी म्हणतात की ते ओबीसी आहेत, नंतर त्यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणतात की ते भारतात एकच जात आहे आणि ती म्हणजे गरीबी. असं असेल तर नरेंद्र मोदी मग ओबीसी कसे?” असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
त्याचबरोबर, “देश फक्त 90 लोक चालवतात. त्यामध्ये आयएएस अधिकारी आहेत, ते संपूर्ण बजेटचे नियोजन करतात. मी त्यावर विचारलं की, या 90 लोकांमध्ये किती अधिकारी हे ओबीसी आणि दलित आहेत. त्यामधील फक्त 3 अधिकारी हे ओबीसी असल्याचे समोर आले. मग हे कसले ओबीसींचे सरकार का? सरकारने भारतातील मोठ्या कंपन्यात किती ओबीसी समाज आणि दलित आहेत हे स्पष्ट करावं.” असे देखील राहुल गांधी म्हणाले.