औरंगाबाद | शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून, त्याचा परिणाम आता ग्रामीण भागातील तालुक्यांमध्येही दिसून येऊ लागला आहे. त्याच पाश्र्वभूमीवर सिल्लोड नगर परिषदेने आता कडक पावले उचलायला सुरूवात केली असून, ग्रामीण भागातील रूग्णसंख्या वाढत असल्याने शहराप्रमाणेच तालुक्याच्या ठिकाणी कडक लॉकडाऊनच्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या वतीने आता रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट सुरू करण्यात येणार आहे.
शहराप्रमाणेच सिल्लोड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यानुसार रस्त्यावर कोरोना टेस्टिंग व्हॅन लावून कोरोना टेस्ट सुरू येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नगर परिषद आता अॅक्शन मोडवर आल्याचे चित्र येत्या काही दिवसांत दिसून येणार आहे. लॉकडाऊनच्या कडक नियमावलींची काटेकोरपणे अंमलबजावणी ग्रामीण भागातही होणे गरजेचे असल्याने ही पावले उचलण्यात येणार आहेत. कोरोना रोखण्यासाठी नगर परिषदेने हे धाडसी उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
सिल्लोड नगर परिषद सध्या शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात आहे. मात्र सिल्लोड शहरासह ग्रामीण भागात रूग्णसंख्या डोकेदुखी ठरत असून, प्रशासनाने यावर कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात लोक सोशल डिस्टसिंगचे पालन करताना दिसून येत नाहीये, तसेच रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याने शहराप्रमाणेच लॉकडाऊनचे नियम अधिक कठोर करण्याची आवश्यकता आहे. नगर परिषदेने विनाकारण फिरणाऱ्यांसाठी आता कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, याला आळा बसेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou