अनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा (Anil Daga) यांना सीबीआयने (CBI) मुंबईत अटक केली. पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून तपासावर परिणाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप डागांवर लाऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.

वकील आनंद डागा यांना सीबीआयकडून रात्री उशिरा अटक केली असून आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. तर सीबीआयने सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी याला यापूर्वी अटक केली आहे. तिवारी आणि डागा यांनी प्राथमिक चौकशी अहवालात फेरफार करून आणि संगनमत करून अनिल डागा यांनी तो अहवाल समाज माध्यमातून प्रसारीत केला आहे, असा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानुसार डागा यांना अटक  करण्यात आली आहे.

दरम्यान, अनिल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना देखील सीबीआयने काल ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 20 मिनिट त्यांची चौकशी केली होती. या प्रकरणात चतुर्वेदी यांचं नाव अद्याप समोर आलेलं नव्हतं. अशातच काल गौरव यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी गौरव यांचे अपहरण केलं असल्याचा आरोप केला होता.

Leave a Comment