अरविंद केजरीवालांना CBI चे समन्स, 16 एप्रिलला चौकशी; नेमकं प्रकरण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीच्या नव्या दारू धोरण भ्रष्टाचार चौकशी प्रकरणी CBI ने आणखी फास आवळले असून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना समन्स बजवण्यात आले आहेत. येत्या 16 एप्रिलला याप्रकरणी केजरीवाल याना चौकशीसाठी बोलवण्यात आलं असून आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीच याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना CBI ने अटक केली आहे.

केजरीवाल याना सीबीआयने समन्स बजावल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. हे अत्याचार नक्कीच संपतील. अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने बोलावलेल्या समन्सबाबत मी संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार आहे असं त्यांनी म्हंटल.

दरम्यान, दिल्ली सरकारचे माजी शिक्षणमंत्री आणि केजरीवाल यांच्यानंतरचे आम आदमी पक्षाचे नंबर 2 क्रमांकाचे नेते मनीष सिसोदिया यांना सीबीआयने यापूर्वीच अबकारी धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात 26 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यातच आता केजरीवाल यांचीही चौकशी करण्यात येणार असून आम आदमी पक्षाला हा मोठा झटका आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची एकजूट पहायला मिळत असतानाच केजरीवाल याना सीबीआयने समन्स बजावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.