CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; आता गृह जिल्ह्यातूनच देता येईल परीक्षा

0
33
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । CBSE बोर्डाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. हे विद्यार्थी लॉकडाऊनमुळे जेथे आहेत, तेथूनच त्यांना परीक्षा देता येणार आहे, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी जाहीर केलं. त्यामुळे लॉकडाऊनमुळे वसतिगृहात राहणारे विद्यार्थी आपापल्या घरी गेले आहेत, त्यांना आता आपापल्या घराजवळ परीक्षा देता येणार आहे. डॉ. पोखरियाल यांनी ट्विटरवरून व्हिडिओद्वारे ही घोषणा केली.

‘CBSEच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १ ते १५ जुलै या कालावधी दरम्यान घेतल्या जाणार आहेत. त्यामुळं जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही तुमच्या शाळांशी संपर्क साधत राहा. तुमच्या शाळा तुम्ही कोणत्या क्षेत्रात आहात, त्याची माहिती बोर्डाला देतील. तुम्ही ज्या भागात आहात, त्या भागातूनच तुम्हाला परीक्षा देता येईल. त्यामुळे निश्चिंत राहा आणि अभ्यास करा,’ असे पोखरियाल यांनी सांगितलं.

CBSEच्या परीक्षांसाठी यापूर्वी ३ हजार परीक्षा केंद्रे होती. आता त्यातही वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात डॉ. पोखरियाल म्हणाले, ‘सीबीएसई दहावी, बारावीच्या उर्वरित परीक्षांसाठी केंद्रांची संख्या वाढवली जात आहे. लॉकडाऊनआधी देशभरात ३ हजार केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार होती. आता या परीक्षा १५ हजार केंद्रांवर आयोजित केल्या जातील. म्हणजेच परीक्षा केंद्रांची संख्या पाचपट वाढवली आहे.’ असं पोखरियाल म्हणाले.

दरम्यान, देशभरात लॉकडाउनच्या काळात राहिलेल्या सर्व पेपरच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यात दहावीचे चार पेपर शिल्लक राहिले हेाते, त्यात समाजशास्त्र, विज्ञान, हिंदी, इंग्रजी संभाषण या पेपरांचा समावेश आहे. तर, बारावीचे तब्बल विविध विभागांतील २३ पेपर शिल्लक राहिले आहेत. त्यात राष्ट्रीय स्तरावरील आणि विभागीय स्तरावरील पेपरचा समावेश आहे. यात होम सायन्स, रसानशास्त्र, बिझनेस स्टडी, बायो टेक्नॉलॉजी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, गणित, अर्थशास्त्र, इतिहास आदी विषयांचा समावेश आहे.

maharashtra times

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here