Wednesday, June 7, 2023

मग मोदींनी राबवलेली ‘स्किल इंडिया’ योजना फेल गेली का?; जयंत पाटील यांचा फडणवीसांना सवाल

मुंबई । महाविकास आघाडी सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीची पोलखोल करत वास्तविक माहिती दिली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील भूमिपुत्रांसंबंधी केलेल्या  वक्तव्याचा जयंत पाटील यांनी समाचार घेतला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या आपल्या पत्रकार परिषदेत “भूमिपुत्रांना स्थलांतरित मजुरांची काम करणं शक्य होणार नाही. भूमिपुत्रांना संधी मिळाली, तर आनंदच आहे, पण राज्य सरकार त्यांच्यामध्ये असं कौशल्य दोन महिन्यांत विकसित करू शकणार नाही,” असं म्हटलं होतं. फडणवीस यांच्या याच वक्तव्यावरून जयंत पाटील यांनी त्यांना टोला होणला.

स्थलांतरित मजुरांच्या अनुपस्थितीमध्ये कारखानदारी सुरू व्हावी, यासाठी महाराष्ट्रातील युवकांकडे स्कील आहे. स्किल इंडिया नावाचा कार्यक्रम नरेंद्र मोदी यांनी सुरू केला. तो फेल गेला की काय, असा प्रश्न निर्माण करणार विधान फडणवीस यांचं आहे. मागच्या पाच वर्षात स्किल इंडियानं काही स्किल दिली असतील, त्याचाही वापर झाला पाहिजे. पण, त्यावर फडणवीस यांचा विश्वास दिसत नाही,” असं म्हणत पाटील यांनी फडणवीस यांना चिमटा काढाला.

ते पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, सर्व मजूर राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. त्या लोकांकडे असलेलं स्किल महाराष्ट्रातील लोकांकडं नाही. तेव्हा फडणवीसांनी महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखण्याचं काम केलं. राज्याच्या तरुणांमध्ये, जनतेमध्ये स्किल आहे. ते पूर्ण ताकदीनं ही कारखानदारी चालू करू शकतात, असा विश्वास आहे. जे गेले आहेत, ते परत येतीलचं असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”