CBSE 10th Result 2023 : 10 वीचा निकाल जाहीर; ‘या’ ठिकाणी चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE 10th Result 2023) दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. CBSE बोर्डाच्या परीक्षेत एकूण 93.12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि results.cbse.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना शाळांनी प्रदान केलेला रोल नंबर टाकावा लागेल.

CBSE 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 1.98% जास्त आहे. सीबीएसई 10वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. यंदा 21.87 लाख विद्यार्थ्यांनी CBSE 10वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील 21,86,940 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

CBSE बोर्ड 10वीचा निकाल 2023 कसा चेक करायचा –

१) सर्वप्रथम CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्या.
२) त्यानंतर होम पेजवरील CBSE Board 10th Result 2023 वर क्लीक करा.
३) एक नवीन लॉगिन पेज अपब होईल
४) इथे तुमचा तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
५) आता तुमचा निकाल दिसेल. तो डाउनलोड करा.
६) भविष्यातील कामकाजासाठी प्रिंट आउट काढा.