CBSE 12th result 2023 : 12 वी चा निकाल जाहीर; इथे चेक करा

CBSE 12th result 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12वीचा CBSE बोर्डाचा निकाल (CBSE 12th result 2023) जाहीर झाला आहे. यंदा 12 वी CBSE बोर्डाचा निकाल 87.33 टक्के लागला आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट, results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in वर जाऊन विद्यार्थी त्यांचे निकाल पाहू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि जन्मतारीख याची माहिती भरावी लागेल.

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत यंदा 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा 12वीचा CBSE बोर्डाचा निकाल 5.38 टक्क्यांनी कमी लागला. सीबीएसई बोर्डाच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 90.68% आणि मुलांचे 84.67% आहे. बारावीनंतर आता CBSE दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे.

12वीचा CBSE बोर्डाचा निकाल चेक करण्यासाठी खालील Steps फॉलोव करा –

1) सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in ला भेट द्या.

2) होम पेज वरील ‘CBSE 12th Result Direct Link’ वर क्लिक करा.

3) त्यानंतर लॉग इन पेज ओपन होईल. तेथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाका.

4) तुमचा CBSE बोर्ड निकाल स्क्रीनवर दिसेल.

5) विद्यार्थ्यांना निकालाची डिजिटल प्रत येथून डाऊनलोड करता येईल.