हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 12 नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभरात दिवाळी साजरी केली जाईल. परंतु सध्या राज्यातील वाढते प्रदूषण बघता यंदाची दिवाळी इको फ्रेंडली पद्धतीने साजरी करण्याची आवश्यकता आहे. या दिवाळीला आपण अनेक प्रदूषण पसरवणारे फटाके आणि नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक ठरणाऱ्या गोष्टी टाळू शकतो. याचबरोबर, इतर काही गोष्टींच्या माध्यमांतून देखील आपण इको फ्रेंडली दिवाळी साजरी करू शकतो. चला तर मग जाणून येऊयात यंदा इको फ्रेंडली दिवाळी कशी साजरी करता येऊ शकते. (Eco Friendly Diwali)
इको फ्रेंडली गिफ्ट द्या – यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही नवीन कपडे भेटवस्तू देण्याऐवजी झाडे नवीन रोपटे भेट म्हणून देऊ शकता. तसेच सोलार लाईट, मातीच्या सुंदर वस्तू देखील भेट म्हणून देता येऊ शकतात. तुम्ही जर अशी कृती केली तर तिसरा व्यक्ती देखील याच पद्धतीने इतर व्यक्तींना भेटवस्तू देईल.
प्रदूषण न पसरवणारे फटाके फोडा – यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही प्रदूषण न करणारे फटाकडे नक्कीच घरी आणू शकता. सध्या बाजारात इको फ्रेंडली फटाकडे देखील अवेलेबल आहेत. त्यामुळे या फटाकड्याच्या माध्यमातून तुम्ही प्रदूषण न करता दिवाळीचा आनंद साजरी करू शकता.
सोलार लाईट वापरा- तुम्हाला जर लाईटचे बचत करायची असेल तर तुम्ही यंदाच्या दिवाळीमध्ये सोलार लाईटचा वापर करू शकता. सोलार लाईटच्या माध्यमातून तुम्ही घर प्रकाशित करू शकता. परंतु ही सोलार लाईट देखील आवश्यक तेवढ्याच प्रमाणात वापरा.
ऑरगॅनिक कलर वापरा – दिवाळीमध्ये रांगोळी काढताना तुम्ही ऑरगॅनिक कलर वापरू शकता. सध्या बाजारात अनेक केमिकल पसरवणारे रांगोळीचे कलर मिळत आहेत. या कलर मुळे त्वचेचे आजार देखील निर्माण होतात. त्यामुळे यंदा तुम्ही ऑरगॅनिक कलर वापरून दिवाळी साजरी करू शकता. हे कलर इतर बाजारात मिळणाऱ्या कलर प्रमाणेच असतात.
दान करा – यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही गरजूंना दान करू शकता. तुमच्या घरामध्ये जर काही आवश्यक असणारे परंतु तुम्ही न वापरणारे सामान असेल तर ते सामान गरजू व्यक्तींना दान करा. तसेच कपडे असतील भेट वस्तू असतील फराळ असेल अशा गोष्टी देखील गरजू व्यक्तींना द्या. अशा पद्धतीने सहजरीत्या तुम्ही यंदाची दिवाळी इको फ्रेंडली पद्धतीने साजरी करू शकता.