चंदीगड : वृत्तसंस्था – सिद्धू मूसेवाला (Sidhu Musewala) यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ते सिद्धू मूसेवाला (Sidhu Musewala) यांची हत्या केल्यानंतर हत्यारे दाखवून सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. एकीकडे पोलीस या हत्येशी संबंधित लोकांना अटक करत असतानाच या हत्येनंतरचा व्हिडिओ आरोपींचे मनोबल वाढवत आहे. या हत्येनंतर एकीकडे पोलीस आरोपींचा शोध घेत होते, तर दुसरीकडे हे आरोपी पोलिसांच्या भीतीची पर्वा न करता व्हिडिओ बनवत होते. मुसेवाला (Sidhu Musewala) हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी आणखी दोघांना अटक केली आहे. अंकित आणि सचिन भिवानी अशी या अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.
#WATCH | In a viral video, Sidhu Moose Wala's murder accused Ankit Sirsa, Priyavrat, Kapil, Sachin Bhivani, & Deepak brandished guns in a vehicle pic.twitter.com/SYBy8lgyRd
— ANI (@ANI) July 4, 2022
आरोपींनी 35 ठिकाणे बदलली
या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, सिद्धू मुसेवालाला (Sidhu Musewala) मारल्यानंतर आरोपी सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. पंजाबी गाण्यांवर हवेत हात फिरवत हत्यारे दाखवताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्यांपैकी अंकित आणि सचिन भिवानी या दोघांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.
पोलीस जेव्हा या (Sidhu Musewala) शूटर्सचा शोध घेत होते, तेव्हा हे आरोपी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फरार होत होते. या लोकांनी जवळपास 35 ठिकाणे बदलल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी बिनधास्त सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. या व्हिडिओमधील आरोपींच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नसल्याचे दिसत आहे.
हे पण वाचा :
IND vs ENG : वन-डे आणि टी20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाकोणाचा आहे समावेश जाणून घ्या
आपले हरवलेले Credit Card कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या
Penny Stocks मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!
Indian Bank कडून कर्ज घेणे महागणार, MCLR 0.15 टक्क्यांनी वाढला !!!
Business Idea : कागदापासून ‘या’ वस्तू तयार करून मिळवा भरपूर पैसे !!!