व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शिंदे गटाकडून शिवसेनेच्या 14 आमदारांना अपात्रतेची नोटीस; आदित्य ठाकरेंचं काय?

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. रोज काही ना काही नवीन घडत आहे. आता शिवसेनेचे नवे प्रतोद भरत गोगावले यांनी सोमवारी झालेल्या फ्लोअर टेस्टनंतर उद्धव गटावर कारवाई करण्याचं ठरवलं आहे. शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस बजावली आहे. आमचा व्हीप न पाळणाऱ्या सर्व आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस आम्ही दिली असल्याचं गोगावले यांनी सांगितले आहे. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर दाखवत त्यांनी आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांचे नाव या कारवाईतून वगळले आहे. तसेच ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतील.

सोमवारी शिंदे सरकारने विधानसभेत फ्लोअर टेस्ट पास केली आहे. त्यात शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटातील आमदारांना व्हीप बजावला. शिंदे सरकार यांना फ्लोर टेस्टमध्ये 164 मते मिळाली. तर विरोधकांना 99 मते मिळाली. व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी फ्लोअर टेस्टच्या अगोदरच स्पष्ट केले होते. फ्लोअर टेस्टमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी शिंदे यांच्या विरोधात मतदान केलं आहे. यामध्ये आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांचादेखील समावेश आहे.

या सगळ्यांवर आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, “आमदार सुनील प्रभू हेच शिवसेनेचे अधिकृत प्रतोद आहेत आणि त्यांचाच व्हीप कायदेशीर आहे , शिवसेनेच्या आमदारांना त्यांचाच व्हीप लागू होईल”, अशी भूमिका युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी घेतली आहे. मी शिवसेना आमदार आणि सर्व सामान्य शिवसैनिकांसोबतच कायम उभा राहीन, असंदेखील ते म्हणाले.

हे पण वाचा :
“साहेब मुंबईत बॅनरवर तुमचा फोटो ठेवणारा पहिला माणूस मी”; ‘या’ बंडखोर आमदाराचा व्हिडिओ व्हायरल

सत्ता गेली पण माज काही केल्या जात नाही…; गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका

फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने गिरीश महाजन अजुन रडतायत; अजितदादांची जोरदार फटकेबाजी

औरंगाबादच्या नामांतरावरून अबू आझमी आक्रमक; सभागृहातच ‘मविआ सरकार’ वर हल्लाबोल

अजितदादा तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर आमच्या कानात सांगा…; मुनगंटीवारांनीही साधला निशाणा